दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वर्धा जिल्हा सहाकरी बँकेचा निर्णय वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावलेले निर्बंध मागे घेऊन बँकिंग परवाना प्रदान केला आहे. त्यानुसार बँकेच्या प्राधिकृत समितीने आढावा घेवून बँकिंग व्यवहार सुरू करण्यासाठी धोरण ठरविले आहे. यात ठेवीदारांकडे कोणत्याही प्रकारचे कर्ज असल्यास त्यांच्या ठेवीतील रक्कम त्यांच्या कर्जात वळती करण्याबाबतचे धोरण ठरविण्यात आले होते. बँकेत असलेल्या ज्या ठेवीदारांकडे कर्ज नाही ते आपले नातेवाईक व इतर स्वकीय कर्जदारांचे कर्ज आपले ठेवीतून भरणा करण्यास तयार आहेत. तशी मागणी मधल्या काळात मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यावर २१ जून २०१६ च्या प्राधिकृत समितीने निर्णय घेवून सुरू हंगामात शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकेचे ठेवीदार त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त आप्तस्वकीयांचे विविध कार्यकारी सेवा संस्थाकडील कर्ज भरण्यास तयार असतील त्यांनी बँकेच्या शाखेत तसेच विविध कार्यकारी सेवा संस्थेशी संपर्क साधून त्यांच्या बँकेतील ठेवी कर्ज खात्यात जमा करून घ्याव्यात व कर्ज खाते निरंक करून ‘नोड्यू प्रमाणपत्र’ प्राप्त करून घ्यावे, असे बँकेच्यावतीने कळविण्यात आले आहे. सदर योजना ३१ जुलै २०१६ पर्यंत राहणार आहे.(प्रतिनिधी)
कर्जदारांच्या ठेवी कर्जात वळत्या करणार
By admin | Published: June 25, 2016 2:03 AM