लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र शासन आणि लोकसहभागातून दहेगाव (स्टे.) येथे यशोदा नदी खोरे पुनर्जीवित प्रकल्प राबविला जात आहेत. या प्रकल्पांतर्गत वेली, नदीचे सरळीकरण, रूंदीकरण व खोलीकरण कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.दोन किमी अंतरावर करण्यात येणाºया या विकास कामांचा शुभारंभ दहेगावच्या सरपंच अर्चना कंगाले, जि.प. सदस्य सुनीता चांदुरकर, माजी जि.प. सदस्य मनोज चांदुरकर, कार्यक्रम समन्वय अधिकारी आनंद जोशी, जलस्त्रोत विकास कार्यक्रम अधिकारी विनोद पारिसे, नवनीत उपाध्याय, मयूर पोजगे, सिद्धार्थ गायकवाड, चंदू मोहिजे, ग्रामपे्ररक अभय मून, संजय दोडके, विजय मगर, रितेश लाटकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना पारिसे यांनी संस्थेचे कार्य, विविध योजना तथा यशोदा नदी-खोरे प्रकल्प व महत्त्वाबाबत माहिती दिली. वर्धा जिल्ह्यातील ४ तालुक्यांत आर्वी, वर्धा, देवळी, हिंगणघाट अशा एकूण १५३ गावांत प्रकल्पाची विकास कामे प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले.वेली नदी सरळीकरण काम बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, राज्य शासन व लोकसहभाग यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. नदीलगत शेताचे दरवर्षी होणाºया पुरामुळे नुकसान होत होते. या सरळीकरणामुळे हे नुकसान थांबणार असून विहिरीला पाण्याची पातळी वाढेल. भूजल पातळी वाढून सिंचनाची सोय होणार आहे. उत्पन्नात वाढ होऊन शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचावणार आहे. जल व मृदसंधारण होऊन जमिनीची सुपिकता वाढेल. ७० शेतकºयांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होईल. यामुळे ५४० एकर जमीन, शेती लाभक्षेत्रात येईल, असे सांगितले.कार्यक्रमाला गजानन दुतारे, वंदन जाधव, रमेश मरगडे, राजू भोवते, सुधीर जगताप, मधुकर ठाकरे, नानाजी दरडे, विशाल दाते, दिलीप खोब्रागडे, रोशन भोवते, राजेश भोवते, प्रशांत बोबडे, समीर गावंडे आदींनी सहकार्य केले.
नदी खोलीकरण, सरळीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:20 PM
कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र शासन आणि लोकसहभागातून दहेगाव (स्टे.) येथे यशोदा नदी खोरे पुनर्जीवित प्रकल्प राबविला जात आहेत.
ठळक मुद्देसंयुक्त उपक्रम : यशोदा नदी-खोरे पुनर्जीवित प्रकल्प