लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संसदेमध्ये चर्चा न करता काँग्रेससह विरोधी पक्षातील सदस्य अधिवेशन काळात कामकाज सुरळीत चालू देत नाहीत. विरोधकांनी तब्बल २३ दिवस संसद बंद पाडली. हा प्रकार लोकशाहीला मारक असून निंदनीय आहे, असे मत खा. रामदास तडस यांनी उपोषण मंडपात व्यक्त केले.विरोधकांच्या निषेधार्थ खा. रामदास तडस यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक -दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनादरम्यान खा. तडस यांनी विरोधकांच्या जनसामान्य विरोधी धोरणांचा निषेध केला. आंदोलनात माजी खासदारांसह भाजप जिल्हाध्यक्ष सहभागी झाले होते. लोकसभा व राज्यसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सलग चार आठवडे बंद पाडून कुठलीही चर्चा न करता विरोधकांनी लोकशाहीची विटंबना केली. याचा निषेध आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. अपूर्ण माहितीच्या आधारे माध्यमांमार्फत खोटे आरोप करणाºया विरोधी पक्षांनी सभागृहात चर्चेची तयारी दर्शविली नाही. चार आठवडे सभागृह बंद पडल्याने संसद काळातील मानधन भाजप खासदारांनी परत केले. सभागृहात मुद्देसुद चर्चा केल्यास पितळ उघडे पडणार, या भीतीने विरोधकांनी सभागृह बंद पाडल्याचा आरोप खासदारांनी केला.दुपारी ३ वाजताच्या सुमारास उपोषण मंडपाला राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देत आंदोलनात सहभागी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी आ.डॉ. पंकज भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, शोभा तडस, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, माजी खासदार विजय मुडे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, महिला आघाडीच्या अर्चना वानखेडे, जि.प. सदस्य पंकज सायंकार, मिलिंद भेंडे, प्रणव जोशी, माधव कोटस्थाने यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सर्व भ्रष्टाचार काँगे्रसच्याच कार्यकाळातील - रामदास तडसनिरव मोदी, मीहूल चोकसी, विजय माल्या, रोटामॅक, व्हीडीयोकॉन बँक लोन, तनिष्क गोल्ड लोन यासह अनेक भ्रष्टाचार काँग्रेस सरकारच्या काळात झाले आहेत. यातील एकही गैरप्रकार भाजप काळातील नसून २००८-०९ मधील आहेत. असे असताना भ्रामक माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम काँगे्रस करीत आहे. एका दिवसात संसदेत २० प्रश्न घेतले जातात. यात आपला क्रमांक लावावा लागतो; पण विरोधक संसदेचे कामकाज रोखून धरत असल्याने २३ दिवसांत एकाही प्रश्नावर चर्चा झाली नाही, असे खा. तडस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आ.डॉ. पंकज भोयर, रामदास आंबटकर, अरुण अडसड, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष अतुल तराळे आदी उपस्थित होते.मुनगंटीवारांची राहुल गांधी, शरद पवारांवर टीकाकुठलीही चर्चा न करता विरोधक संसदेतील कामकाम बंद पाडत आहेत. ही बाब निंदनीयच आहे. ज्या काँग्रेस व राकाँच्या पुढाºयांनी इतकी वर्षे सत्ता भोगली त्यांना भाजपची सत्ता पोटात दुखणारीच ठरत आहे. काँग्रेस व राकाँच्या सरकारला इतक्या वर्षात सामान्य माणसांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण हे प्रश्न सोडविता आले नाही. ते आता तीन वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारवर बिनबुडाचे आरोप करीत ताशेरे ओढत आहे. तीन वर्षांत सर्व प्रश्न सुटतील, असा विरोधकांचा प्रश्न आठवे आश्चर्यच मानावे लागेल. एकीकडे नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून विचार करावा की देश कुठे जाईल आणि दुसरीकडे राकाँचे शरद पवार आणि राहूल गांधी यांचा चेहरा पंतप्रधान म्हणून डोळ्यासमोर ठेवून विचार केल्यास चित्र स्पष्ट होईल, अशी गुगली उपोषण मंडपात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शक करताना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी टाकली. इतकेच नव्हे तर ना. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने काँग्रेस व राकाँचा खरा चेहरा जनसामान्यांसमोर आणण्याचे आवाहन केले.
संसदेचे कामकाज खोळंबणे निंदनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 11:28 PM
संसदेमध्ये चर्चा न करता काँग्रेससह विरोधी पक्षातील सदस्य अधिवेशन काळात कामकाज सुरळीत चालू देत नाहीत. विरोधकांनी तब्बल २३ दिवस संसद बंद पाडली. हा प्रकार लोकशाहीला मारक असून निंदनीय आहे, असे मत खा. रामदास तडस यांनी उपोषण मंडपात व्यक्त केले.
ठळक मुद्देखासदारांचे लाक्षणिक उपोषण : जिल्हाध्यक्षासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती