लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून गुन्हे शाखेकडून गावठी दारूभट्ट्या उद्धवस्त करीत कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी नागसेननगर, आनंदनगर, पुलफैल परिसरात वॉश आऊट मोहीम राबवून एक लाख सात हजार रुपयांचा ३३० लिटर मोहा रसायन नष्ट केला.नागसेननगर परिसरातील नाल्याच्या लगत पोलिसांनी छापा मारला असता जमिनीत गाडून असलेल्या तीन ड्रममधील ३०० लिटर कच्चा मोहा सडवा रसायन, दारूभट्टीचे साहित्य असा एकूण १७ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. तर आनंदनगर, पुलफैल परिसरात छापा मारला असता दोन दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. तसेच जमिनीत गाडून ठेवलेल्या १२ ड्रममधील १ हजार २०० लिटर गावठी दारू आणि प्लास्टिक डबकीत ३० लिटर दारूसह दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ९० हजार रुपयांचा दारूसाठा नष्ट केला. ही कारवाई ठाणेदार स्थानिक गुन्हे अन्वेषण शोखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद रामटेके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.आष्टी पोलिसांकडून एक लाखाचा दारूसाठा जप्तआष्टी (शहीद) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आष्टी पोलिसांनी दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे. पोलिसांनी वाडेगाव, माणिकवाडा जंगलातील नदीकाठावर वॉश आउट मोहीम राबवून सुमारे एक लाख रूपयांचा मोहा दारूसाठा नष्ट केला. आष्टी ठाण्यांतर्गत मागील वीस दिवसांपासून दारूविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येक ठिकाणी कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणेदार चांदे यांनी सांगितले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार जितेंद्र चांदे, नबी शेख, भेंडे, परकोट, राहुल तेलंग, गुजरकर, नीलेश वंजारी, मंगेश भगत आदींसह गृहरक्षक दलातील कर्मचाऱ्यांनी केली.
एक लाखाचा ३३० लिटर मोहा रसायन नाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 5:00 AM
नागसेननगर परिसरातील नाल्याच्या लगत पोलिसांनी छापा मारला असता जमिनीत गाडून असलेल्या तीन ड्रममधील ३०० लिटर कच्चा मोहा सडवा रसायन, दारूभट्टीचे साहित्य असा एकूण १७ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. तर आनंदनगर, पुलफैल परिसरात छापा मारला असता दोन दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.
ठळक मुद्देदारूभट्टी केली उद्ध्वस्त : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची ‘वॉश आऊट मोहीम’