शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

विकास ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 12:18 AM

मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात वर्ध्यात सिमेंटीकरणाद्वारे मोठ्या प्रमाणात विकास साधला गेला आहे. शहरातील डांबरी रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. काही कामे प्रगतिपथावर आहे; मात्र नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागात समन्वयाचा अभाव असल्यामुळे कंत्राटदाराचे मनमर्जी काम सुरू आहे.

ठळक मुद्देजागोजागी मृत्यूचे सापळे : नगरपालिका आणि बांधकाम विभागात समन्वयाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात वर्ध्यात सिमेंटीकरणाद्वारे मोठ्या प्रमाणात विकास साधला गेला आहे. शहरातील डांबरी रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. काही कामे प्रगतिपथावर आहे; मात्र नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागात समन्वयाचा अभाव असल्यामुळे कंत्राटदाराचे मनमर्जी काम सुरू आहे. परिणामी, हा विकास वर्धेकरांसाठी जीवघेणा ठरत आहे.शहरातील धुनिवाले मठ ते धंतोली चौकापर्यंतचा बॅचलर रोड, आर्वी नाका ते जुनापाणी चौक तसेच महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गांचे सिमेेंटीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. आर्वी नाका ते शिवाजी चौक, डॉ. आंबेडकर चौक ते झाशी राणी चौकापर्यंतच्या मार्गाचे सिमेेंटीकरण सुरू आहे. ज्या मार्गाचे काम पूर्णत्वास गेले, त्या मार्गांची उंची चांगलीच वाढल्याने लगतच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत आहे. त्यामुळे या नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच ज्या मार्गाचे काम अद्याप पूर्णत्वास गेले नाही, त्या मार्गावरील काम अगदी संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहतूक प्रभावित होत असून वर्धेकरांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. कंत्राटदारांची नियोजनशून्यता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यांच्या बांधकामाच्या कालावधीत अनेक किरकोळ व मोठे अपघात झाल्याने काहींना अपंगत्वही आले आहे.भूमिगत योजनेने वाढविली डोकेदुखीकेंद्र शासनाद्वारे वर्ध्यात अमृत योजना राबविण्यात येत आहे. शंभर कोटी रुपयांवर निधी खर्च करून जलवाहिनी आणि भूमिगत गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. जलवाहिनीचे काम करीत असताना कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजूला काही दिवसांपूर्वीच पालिकेकडून लावण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक फोडून जलवाहिनी टाकली. तसेच काही ठिकाणी रस्त्यांचेही खोदकाम करण्यात आले. जवळपास दीड ते दोन वर्षांपासून हे काम सुरू असून अद्यापही पूर्णत्वास गेले नसल्याने नागरिकांच्या घरासमोरील खड्डे कायमच आहेत.भूमिगत गटार योजनेच्या कामात काही दिवसांपूर्वीच लाखो रुपये खर्चून बांधलेले सिमेंटचे रस्ते अल्पावधीतच मधोमध खोदण्यात आले. त्यामुळे या रस्त्यांवर केलेला खर्च निरर्थकच ठरला. विशेषत: मधोमध खोदलेले बहुतांश रस्ते अद्यापही पूर्ण बुजविलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात शहरातील अंतर्गत रस्तांवरही चिखल साचलेला दिसून येतो. त्यामुळे सिमेंट व डांबरी रस्त्याला पांदण रस्त्याचे स्वरूप आलेले दिसते.गटार योजनेच्या कामाकरिता जागोजागी गटार तयार करण्यात आले. पण, काम करीत असताना कंत्राटदाराने सूचना फलक न लावल्यामुळे बहुतांश ठिकाणी या गटाराच्या खड्डयात वाहनासह नागरिकही साठवले आहे. इतकेच नाही तर गांधीनरातील एका खड्डयात शाळेकरी मुलगा आदित्य बैस याला आपला जीवही गमवावा लागला. तरीही काहीही सुधारणा होताना दिसून येत नाही. अद्यापही बऱ्याच ठिकाणी सूचना फलकाशिवायच काम केली जात आहेत.रस्ता झाला; पण, दुभाजकाचा पत्ता नाही!आर्वी नाका ते जुनापाणी चौक हा अतिशय वर्दळीचा भाग आहे. या मार्गावरील सिमेंटीकरणाचे काम पूर्ण होऊन सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. पण, अद्यापही या मार्गावर दुभाजक बसविण्यात आले नसल्याने वाहनचालक कोठूनही वाहने पळविता. दुभाजकाअभावी मार्गावरील वाहतूक सुसाट झाली असून याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, येथे दररोज अपघात पाहावयास मिळत आहेत.अतिक्रमणाचेही ‘येरे माझ्या मागल्या’सिमेंटीकरण आणि रुंदीकरणाकरिता आर्वी नाका ते जुनापाणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते गांधी चौक आणि बॅचलर रोडवरील अतिक्रमण हटविण्यात आले होते. त्यामुळे रस्त्याही रुंद दिसत होता. परंतु, आता बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमण पुन्हा वाढले आहे. आर्वी नाका ते जुनापाणी चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून नालीवरच दुकानदारी थाटण्यात आली आहे. त्यामुळे समस्या कायम आहेत.