लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सर्वसामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढेल. या प्रकरणाची हाताळणी मुंबईत करण्यात आली आहे. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करेल. मात्र, याच निमित्ताने महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सीबीआय चौकशीमुळे सुशांतसिंग राजपूत आणि त्यांच्या करोडो चाहत्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा, असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी वर्धा जिल्ह्यातील कोविड केअर युनिटची पाहणी केली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी वर्धा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपरोक्त प्रतिक्रिया दिली. सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विटसंदर्भात फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी केलेली मागणी कदाचित त्यांच्या आजोबांना आवडी नसेल. पार्थ पवार यांनी नेमके काय ट्विट केले आहे याची मला माहिती नाही. त्यांनी सीबीआय चौकशी केली हे खरे आहे. यावर मला काही भाष्य करायचे नाही, असे यावेळी फडणवीस म्हणाले.