शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

डिझेल दरवाढीने एसटीवर पडतोय ताण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2021 3:07 PM

Wardha News डिझेल दरवाढीचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसलाही बसला असून महिन्याला तीन कोटी रूपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.

ठळक मुद्देतीन कोटी ५० लाखांचा फटकादररोजचे सरासरी वाहतूक उत्पन्न २० लाखांचे

 लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : डिझेल दरवाढीचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसलाही बसला असून महिन्याला तीन कोटी रूपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे. कोरोनामुळे सध्या एसटीच्या फेऱ्या कमी असल्या तरी डिझेल दरवाढीचा मोठा ताण एसटी बसवर पडत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे मार्च ते नोव्हेंबर महिन्यांपर्यंत एसटीची सेवा बंद होती. कोरोना काळापूर्वी जिल्ह्यातील पाच आगारातून दररोज ५००वर बसफेऱ्या होत्या. मात्र, आता त्या कमी झाल्या असून दिवसा अंदाजे २१० बस फिरतात. एक बस दररोज किमान ३४० ते ३५० सरासरी किलोमीटरचा प्रवास करते. एका एसटीचे ॲव्हरेज चार ते पाच किलोमीटर प्रति लिटर आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एसटीच्या फेऱ्या कमी झाल्या तरीही डिझेलवरील खर्चही वाढला आहे.

सध्या डिझेलच्या वाढत्या दरामुळे प्रति किलोमीटर २ रूपये ४० पैशांनी डिझेल महाग पडते. त्यातच प्रवासी संख्या कमी झाल्याने एसटीचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

जिल्ह्यातील पाच आगारातून दररोज २५० एसटी बस धावत होत्या मात्र, आता कोरोनामुळे या फेऱ्या कमी होऊन २१० एसटी दररोज धावत आहे. एसटीचे दररोजचे वाहतूक उत्पन्न २० लाखांचे असून डिझेलवर तब्बल ३ कोटी ५० लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

ट्रान्सपोर्ट चालकांचे मोडले कंबरडे

अव्वाच्या सव्वा आकारल्या जात असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या करांच्या ओझ्याखाली दबलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे. डिझेलचे दर इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने अतिरिक्त आर्थिक भार सहन करून मालवाहतूक करणे अवघड झाले आहे. वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरामुळे ट्रान्सपोर्ट चालकांचे कंबरडे मोडले आहे.

नागरिकांच्या खिशाला बसतेय झळ

पेट्राेलचे भाव दररोज वाढत असल्यामुळे नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. सत्ताधारी अन् विरोधी सगळेच राजकीय पक्ष या गंभीर विषयात अद्यापही सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहिले नसल्याचे दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही कच्चा तेलाचे दर आणि बाजारातील दर तसेच आजचे दर यातील तफावत लोक मांडताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल...

पेट्राेलचा दर १०० रुपये प्रति लिटर होईल...सज्ज राहा, एकदा का पेट्राेलचा दर १०० रूपये प्रति लिटर झाला की ताबडताेब वाहनावरून खाली उतरा, आपले हेल्मेट काढा आणि आकाशाकडे पाहा, शतक ठोकल्यानंतर अशा पद्धतीने अभिवादन करायची प्रथाच आहे. अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.

 

जिल्ह्यात एकूण आगार- ०५

एसटीच्या एकूण फेऱ्या- २५०

सध्या दररोजच्या फेऱ्या- २१०

एका बसचा दररोजचा प्रवास- ३४० किमी

डिझेलचा खर्च- ३ कोटी ५० लाख

दररोजचे सरासरी वाहतूक उत्पन्न -- २० लाख

टॅग्स :state transportएसटी