शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

जिल्हा प्रशासन अन् पोर्टलवरील आकडेवारीत तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 5:00 AM

सोमवार, दि. १७ मे रोजी वर्धा जिल्ह्यात नवीन ३०० कोविडबाधित सापडल्याचे तसेच तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आणि ५६२ व्यक्ती कोविडमुक्त झाल्याचे संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आले आहे. शिवाय १ हजार १४७ कोविड चाचण्या करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे; तर याचदिवशी जिल्हा प्रशासनाकडून मागील २४ तासांत जिल्ह्यात ८८१ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर ११० नवीन कोविडबाधित सापडल्याचे व त्यापैकी आठ कोविडबाधित जिल्ह्याबाहेरील असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखऱ्या आकडेवारीबाबत नागरिकांकडून उपस्थित होताहेत प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात कोरोनाची एन्ट्री झाल्यापासून प्रत्येक कोविड बाधितासह कोरोनामुक्त तसेच कोविड मृतांची नोंद प्रशासन घेत आहे. शिवाय ती माहिती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपडेट केली जात आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीत आणि संकेत स्थळावरून जाहीर होत असलेल्या आकडेवारीत मोठी तफावत येत असल्याने नेमकी खरी माहिती कुठली, असा प्रश्न सध्या नागरिकांकडून विचारला जात आहे.सोमवार, दि. १७ मे रोजी वर्धा जिल्ह्यात नवीन ३०० कोविडबाधित सापडल्याचे तसेच तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आणि ५६२ व्यक्ती कोविडमुक्त झाल्याचे संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आले आहे. शिवाय १ हजार १४७ कोविड चाचण्या करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे; तर याचदिवशी जिल्हा प्रशासनाकडून मागील २४ तासांत जिल्ह्यात ८८१ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर ११० नवीन कोविडबाधित सापडल्याचे व त्यापैकी आठ कोविडबाधित जिल्ह्याबाहेरील असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर एकाचदिवशी ३५० व्यक्ती कोविडमुक्त झाले. तसेच कोरोनामुळे १८ व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यापैकी तीन व्यक्ती जिल्ह्याबाहेरील असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच संकेतस्थळ आणि जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या माहितीत तफावत येत असल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोविड बाधितांच्या आकडेवारीत तफावर येत असल्याने आरोग्य विभागाची बाजू जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

कोविडमुक्त झालेत किती?nसोमवारपर्यंत जिल्ह्यातील ३८ हजार ९५५ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले; पण याचदिवशी संकेतस्थळावर ४६ हजार २६१ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे कोविडमुक्त किती व्यक्ती झालेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चाचण्यांच्या आकडेवारीत तफावत- सोमवारपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३३ हजार ३२९ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, संकेतस्थळावर सोमवारपर्यंत वर्धा जिल्ह्यात ३ लाख ११ हजार ९२५ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आल्याची नोंद घेण्यात आली आहे.

मृतांच्या आकडेवारीत ३५० ने फरकसोमवार, दि. १७ मे रोजीपर्यंत जिल्ह्यातील १ हजार १५५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, संकेतस्थळावर केवळ ८०५ कोविड मृतांची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे संकेतस्थळावरील माहिती तातडीने आणि वेळोवेळी अपडेट करण्याची गरज आहे.

कोविडबाधितांच्या संख्येतही फरक- जिल्हा प्रशासनाने सोमवारपर्यंत जिल्ह्यातील ४४ हजार ४८३ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याची नोंद घेतली आहे. असे असले तरी, संकेतस्थळावर ५३ हजार ३१४ कोविड बाधितांची नोंद असल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू