लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील प्रत्येक व्यावसायिकांनी त्यांच्या मालकीच्या व्यावसायिक प्रतिष्ठानाची तसेच खासगी शिकवणी घेणाऱ्यांनी त्यांच्या ताब्यातील इमारतीचे ‘फायर सेफ्टी आॅडीट’ करणे गरजेचे आहे. असे असले तरी अनेक हॉटेल व्यावसायिक तसेच व्यावसायिक प्रतिष्ठान मालक आणि शिकवणी वर्ग चालविणाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे न.प. प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत सदर व्यक्तींनी अग्निप्रतिबंधक उपाययोजना करून घ्याव्या; अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना न.प.प्रशासनाने दिल्या आहेत.वर्धा शहरात नवीन इमारत बांधकाम, वाणिज्यीक प्रतिष्ठान, व्यावसायिक इमारतीचे बांधकाम करताना रितसर अर्ज करून परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. तसेच नव निर्मित इमारतीमध्ये महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवनसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या कलम ३(२) अन्वये इमारतीत अग्निप्रतिबंधक उपाययोजना करणे अनिवार्य आहे. परंतु, शहरातील अनेक व्यावसायिक, हॉटेल, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, सार्वजनिक इमारती तसेच खासगी शिकवणी वर्ग घेणाºयांनी ‘फायर सेफ्टी आॅडीट’च करून घेतले नसल्याचे न.प.च्या अधिकाºयांच्या निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘फायर सेफ्टी आॅडीट’ होणे हे गरजेचे असून येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत सदर व्यावसायिकांसह मालमत्ताधारकांनी अग्निप्रतिबंधक उपाययोजना करून ते व्यवस्थित आहे की नाही याची तपासणी न.प.च्या अग्निशमन विभागाच्या तज्ज्ञांकडून करून घ्यावे, असे न.प.च्यावतीने सांगण्यात आले. सदर सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोरच कारवाई करण्यात येईल, असेही वर्धा न.प. प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.परवाना करणार निलंबितसर्व मालमत्ता धारकांनी पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत अग्निप्रतिबंधक उपाययोजना करून लायसन्स धारक अभिकरणाकडून प्राप्त होणारे प्रमाणपत्र न.प.च्या अग्निशमन विभागात सादर करावे. अन्यथा न.प. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पाहणीत अग्निप्रतिबंधक विषयाला फाटा दिल्या जात असल्याचे निदर्शनास येताच सदर व्यावसायिक प्रतिष्ठानाचा परवानाच निलंबित करण्यात येणार आहे. शिवाय त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे.महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवनसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या कलम ३(२) अन्वये प्रत्येक हॉटेल व्यावसायिक, व्यावसायिक प्रतिष्ठान मालक, शासकीय कार्यालय तसेच शिकवणी वर्ग घेणाऱ्यांनी ‘फायर सेफ्टी आॅडीट’ करून घेणे अनिवार्य आहे. तसे न करणाऱ्यांवर न.प. प्रशासन दंडात्मक आणि व्यावसायिक प्रतिष्ठानाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करणार आहे.- रवींद्र जगताप, विभाग प्रमुख, अग्निशमन विभाग, न.प. वर्धा.
अग्निप्रतिबंधक उपाययोजना न करणाऱ्यांची वाढणार अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 10:04 PM
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरातील प्रत्येक व्यावसायिकांनी त्यांच्या मालकीच्या व्यावसायिक प्रतिष्ठानाची तसेच खासगी शिकवणी घेणाऱ्यांनी त्यांच्या ताब्यातील इमारतीचे ...
ठळक मुद्देतीन महिन्यांची ‘डेडलाईन’। दंडात्मक कारवाईला जावे लागणार सामोरे