लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संततधार पाऊस सुरू असताना स्थानिक हवालदारपूरा येथील जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेत कुठलीही जीवितहाणी झाली नाही.माजी नगरसेवक कमल कुलधरिया यांच्या घराच्या मागील बाजुस मुस्तफा तुरक, गफ्फार तुरक व अजीज तुरक या तीन भावांच्या मालकीची जीर्ण इमारत आहे. गत दहा ते पंधरा वर्षापासून येथे कुणीच राहत नसल्यामुळे ही इमारत कुलूप बंद आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या पावसामुळे इमारतीचा समोरील भाग कोसळला. यात इमारतीच्या बाजुला राहणारे शेख इरशाद व शेख इमरान यांचे कुटुंबीय थोडक्यात बाचले. तर परिसरात उभ्या असलेल्या दोन दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सदर इमारतीचा उर्वरित भागाची दैनावस्था झाली आहे. सदर जीर्ण इमारत केव्हा जमीनदोस्त होईल याचाही नेम नाही. इमारतीपासूनच रहदारीचा रस्ता आहे. परिसरात लहान मुले खेळतात. त्यामुळे सदर जीर्ण इमारत इतरांच्या जीवितास धोकादायक ठरत आहे. जीर्ण इमारत इतरांच्या जीवितास धोकादायक ठरत असल्याने नागरिकांनी घरमालकांना वारंवार माहिती दिली. इतकेच नव्हे तर स्थानिक नगर पालिकेलाही लेखी तक्रार करुन जीर्ण इमारत पाडण्याची विनंती केली. परंतु, अद्यापही कारवाई करण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे. याकडे नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी आहे.
जीर्ण इमारत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:50 AM
संततधार पाऊस सुरू असताना स्थानिक हवालदारपूरा येथील जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेत कुठलीही जीवितहाणी झाली नाही.
ठळक मुद्देदोन दुचाकींचे झाले नुकसान