लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जा.) : निमगाव-पढेगाव, पांदण रस्ता असून पुर्णत: चिखलमय झाला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांची वहिवाट प्रभावित झाली आहे.निमगाव (स.) ते पढेगाव ३ कि़मी. चे अंतर असून हा पांदण रस्ता आहे. या पांदण रस्त्याचे ३ वर्षापूर्वी माती काम करण्यात आले होते. यामुळे पावसाळ्यामध्ये या पांदण रस्त्याने चिखलांचे साम्राज्य असते.सदर रस्त्यानी दोन्ही गावाची शेती आहे. दोन्ही गावे मिळून दिडशेच्यावर शेतकऱ्यांची ३००-४०० एकर शेती आहे. हल्ली शेतीचा हंगाम सुरू असल्यामुळे येथील शेतकरी विविध कामात व्यस्त आहे. निंदन, डवरणे, फवरणी व विशेष म्हणजे खत देणे कारण इतर कामाचे साहित्य या रस्त्यातून कसे तरी नेता येईल. यांची चिंता शेतकऱ्यांना आहे. ु रासायनिक खत हे बैलबंडीने किंवा इतर वाहनाने न्यावे लागतात. परंतु सदर रस्त्याने पायदळ चालणे कठीण झाले आहे. तर बैलबंडी कशी न्यायची हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.पाच सहा दिवसांपासून पावसाची रीपरीप सुरू असल्यामुळे पांदण रस्त्याची अधिकच दैनावस्था झाली आहे. रस्ता जर असाच राहील तर दोन्ही गावच्या शेतकऱ्यांची जमीन पडीक पउल्या शिवाय राहणार नाही, असेही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. संबंधित विभागाने तात्पुरता तरी रस्ता दुरूस्त करून द्यावा व वहीवाटीची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी दोन्ही गावच्या शेतकऱ्यांनी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना या पांदण रस्त्यातून जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शेती अवजारे नेताना कसरत करावी लागत आहे.पांदण रस्त्याचे खडीकरण कराजिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून सामाजिक संस्थांच्या मदतीने पांदण रस्ता विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला. जिल्ह्यात १२०० ते १५०० पांदण रस्ते अतिक्रमण मोकळे करून तयार करण्यात आले. मातीकाम करण्यासोबतच बाजुला नाल्याही तयार करण्यात आल्या. मात्र पावसाळ्यात या रस्त्यांवर आता चिखल निर्माण झाला आहे. याच्या खडीकरणाचा कार्यक्रम शासनाने हाती घ्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
निमगाव-पढेगाव पांदण रस्त्याची दैनावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:37 PM
निमगाव-पढेगाव, पांदण रस्ता असून पुर्णत: चिखलमय झाला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांची वहिवाट प्रभावित झाली आहे. निमगाव (स.) ते पढेगाव ३ कि़मी. चे अंतर असून हा पांदण रस्ता आहे. या पांदण रस्त्याचे ३ वर्षापूर्वी माती काम करण्यात आले होते.
ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : दोन गावातील शेतकऱ्यांची वहिवाट प्रभावित