शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

दिंदोडा प्रकल्पग्रस्तांचे धरणे आंदोलन

By admin | Published: April 24, 2017 12:22 AM

दिंदोडा प्रकल्पाकरिता संपादित केलेली जमीन परत करण्याच्या मागणीसाठी दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने प्रकल्पस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले.

जमिनी परत करण्याची मागणी : जिल्हा प्रशासनाला निवेदनातून साकडेवर्धा : दिंदोडा प्रकल्पाकरिता संपादित केलेली जमीन परत करण्याच्या मागणीसाठी दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने प्रकल्पस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. यात प्रकल्पग्रस्तांनी मोठा सहभाग नोंदवित मागण्या मान्य केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले.वारंवार आंदोलन करूनही दखल घेतली जात नसल्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार यावेळी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने केला. प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष पुंडलिक तिजारे, उपाध्यक्ष अभिजीत मांडेकर, सचिव चंपतराव साळवे, कोषाध्यक्ष पी.जी. भिडकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. अनेक वर्षे उलटली तरीही दिंदोडा बॅरेज प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळत नाही. शिवाय प्रकल्पाच्या उभारणीकरिता निधीचीही तरतूद केली जात नाही. अलीकडेच राज्य शासनाने २१ प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली; पण त्यात दिंदोडा बॅरेज प्रकल्पाचा समावेश नाही. वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुपिक जमीन या प्रकल्पासाठी अनेक वर्षांपूर्वी शासनाने अल्प मोबदला देत संपादित केली; पण त्यानंतर शासनाने मान्य केल्याप्रमाणे अद्याप प्रती एकर एक लाख रुपये अनुदान दिले नाही. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील बेरोजगाराला नोकरी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सर्व बाजूने प्रकल्पग्रस्तांची शासनाने कोंडी केली आहे. यामुळेच आमची संपादित केलेली २ हजार ८०६ हेक्टर ७८ आर शेतजमीन आम्हाला परत द्यावी, अशी मागणी दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने केली आहे. आमचे म्हणणे शासन समजून घ्यायला तयार नसेल व मान्य केल्याप्रमाणे अनुदानस्वरुप मोबदला देत नसेल तर आमची जमीन परत मागण्याशिवाय पर्यायच नसल्याचेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. संपादित जमिनीचा जेमतेमच मोबदला सन २००० मध्ये शेतकऱ्यांना देण्यात आला होता. शेतकऱ्यांनी मोबदला कमी मिळाल्याचा आक्षेप घेतला असता प्रती एकर एक लाख रुपये अनुदान देण्याचे मान्य करण्यात आले होते; पण शासनाने एक रुपयाही न दिल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे. शासनाने प्रती एकर एक लाख रुपये व १७ वर्षांचे व्याज द्यावे वा जमिनी परत करीत शासनाच्या मालकीची नोंद काढावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)सुपीक जमिनी पडिक २०१५ व १६ मध्ये शासनाने संपादित जमिनीवर आपला ताबा दाखविण्याकरिता सातबारावर नोंद करून घेतली. प्रकल्प होत नाही, अनुदान दिले जात नाही व जमिनीही परत केल्या जात नसल्याने सुपीक जमिनी पडिक आहेत. यामुळे जमिनी परत कराव्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कायदाही बासनात२०१४ च्या शासकीय परिपत्रकात सलग पाच वर्षांच्या कालवधीत संपादित जमिनीवर प्रकल्प न उभारल्यास ती जमीन संबंधित शेतकऱ्याला परत करण्यात यावी, असे स्पष्ट नमूद केले आहे. असे असताना शासनाचाच कायदा शासकीय अधिकाऱ्यांनी बासनात गुंडाळून ठेवल्याचे प्रकल्पग्रस्तांनी निवेदनात नमूद केले आहे.