शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

देशाची वाटचाल महासत्ता बनण्याच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:11 AM

गत तीन वर्षांत देशभरातील पाच कोटी लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस सिलिंडर वितरित करण्यात आले आहे. यंदा नव्याने तीन कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : उज्ज्वला दिवसानिमित्त गरजुंना गॅस सिलिंडरचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : गत तीन वर्षांत देशभरातील पाच कोटी लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस सिलिंडर वितरित करण्यात आले आहे. यंदा नव्याने तीन कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. समाजातील दुर्बल घटकाला सन्मानाने जगता यावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विविध उपक्रम राबवित आहेत. सध्या देशाची वाटचाल महासत्ता बनण्याच्या दिशेने सुरू आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.उज्वला दिवसानिमित्त आयोजित गॅस सिलिंडर वितरण समारंभात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर इंडियन गॅस एजन्सीचे डीजीएम ए.पी. संकलेचा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, पं. स. उपसभापती किशोर गव्हाळकर, न. प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, नगरसेवक नंदू वैद्य, एजन्सीचे संचालक रमेश जुगनाके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.स्थानिक आर. गॅस इंडियनच्यावतीनेआयोजित कार्यक्रमात खा. तडस पुढे म्हणाले, उज्ज्वला गॅस सोबतच प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून समाजातील बेघरांना न्याय दिला जात आहे. या योजनेतून देवळीत ८५० लाभार्थ्यांची घरे मंजूर करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही अशांना जागा विकत घेण्यासाठी ५० हजार रूपये किंवा अशांची निवासी कॉलनी उभारून घरे बांधून दिली जाणार आहे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.भाजपाचे जिल्हाध्यक्ष बकाने म्हणाले की, सरकारच्या ग्राम स्वराज्य योजनेंतर्गत येत्या पंधरा दिवसात आठ कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. उज्ज्वला दिवस हा त्याच कार्यक्रमाचा एक भाग आहे, असे सांगितले. या योजनेंतर्गत मिळणारी गॅस कर्ज स्वरूपात असून या पैशाचा भरणा लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सबसीडीतून कपात केला जाणार आहे. सहा कनेक्शन नंतर सातव्या कनेक्शनपासून पैशाची कपात केली जाणार असल्याचेही यावेळी बकाने यांनी स्पष्ट केले. ही योजना जागतिक स्तरावर क्रांतीकारक ठरली असल्याचे सकलेचा यांनी सांगितले.येथील आर गॅस एजन्सीच्यावतीने यापूर्वी ५२७ व कार्यक्रमाचे दिवशी १० लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले. यामध्ये पळसगाव येथील चिंधा उईके, वेणू साखरकर, अंजना फुपटे, बाभुळगावकर (खोसे) येथील सुनंदा बोबडे व संगीता बोबडे, देवळी येथील मैना पचारे व सुवर्णा जयपूरकर तसेच दुर्गा राऊत (रत्नापूर) व वच्छला शिंदे (आपटी) व बेबी आत्राम (फत्तेपूर) याचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचालन भाजपाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल चोपडा यांनी केले.