लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: आर्वी तालुक्यातील( बगाजी सागर) निम्न वर्धा प्रकल्पाच्या ३३ पैकी आज शुक्रवारी १५ दारे उघडण्यात आली. या प्रकल्पातील एकूण ६०२ क्युमेंक पाणी वर्धा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यावेळी संदीप हासे व सर्व अधिकारी सहाय्यक कार्यकारी अभियंता निम्न वर्धा प्रकल्प उपविभाग क्रमांक दोनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.नदी काठावरील नागरिकांनी वर्धा नदी पात्रात जाऊ नये व सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या वर्धा नदी काठावरील असलेल्या धनोडी बहादरपुर ,वडगाव पांडे ,दिघी होणाडे , सायखेडा आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेया निम्न वर्धा प्रकल्पातील एकूण साठा 253 पॉईंट 34 दशलक्ष घनमीटर म्हणजे (8. 95 टीएमसी) असून संकल्पित जिवंत साठा 216 पॉईंट 83 दशलक्ष घनमीटर आहे आजची पाणी पातळी 282 पॉईंट 880 मीटर असून जिवंत साठा 160.33 दशलक्ष घनमीटर असल्याची माहिती या निम्न्न वर्धा प्रकल्पाचे संदीप हापसे यांनी दिली
वर्धा जिल्ह्यातील निम्न्न वर्धा धरणाच्या १५ दारातून विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 1:16 PM
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: आर्वी तालुक्यातील( बगाजी सागर) निम्न वर्धा प्रकल्पाच्या ३३ पैकी आज शुक्रवारी १५ दारे उघडण्यात आली. ...
ठळक मुद्देनदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा