लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दररोज सकाळी व सायंकाळी मोठ्या संख्येने खेळाडू विविध मैदानी खेळांचा सराव करण्यासाठी येतात. परंतु, मैदानावर पाहिजे त्या सोई-सुविधाच नसल्याने खेळाडुंना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देत तात्काळ सोई-सुविधा पुरविण्यात याव्या, अशी मागणी जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.मैदानी खेळ खेळल्यास आरोग्य निरोगी राहते;परिणामी प्रत्येकाने मैदानी खेळ खेळावे असे समाजातील प्रत्येक स्तरातून सांगिंतले जाते. जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरात विविध मैदानी खेळ खेळणाºयांची संख्याही मोठी आहे. मात्र, त्यांना सराव करण्यासाठी स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हा क्रीडा संकुलाचे मैदान हा एकमेव पर्याय आहे. येथे पाहिजे त्या सोई-सुविधा असाव्या असे क्रमप्राप्त असताना खेळाडुंना सुविधा पुरविण्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. इतकेच नव्हे तर लोकप्रतिनिधीही त्याकडे पाठ दाखवित आहेत. परिणामी, खेळाडू प्रवृत्तीला खो मिळत आहे. जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरात खेळाडू प्रवृत्तीचे जतन करण्यासाठी स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्या अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनातून करण्यात आलेल्या मागणींवर वेळीच विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना तुषार देवढे, पंकज मुन, शुभम खराबे, निखील बोटरे, पैपाज शेख, साई बिटके, अमीत देवढे, प्रवीण निकार, राजेंद्र ढोबळे, रवी टेकाम, रंजीत कांबळे, राजेश वरठे, अनिकेत खुजे, निखील साठे, प्रतीक ठोंबरे, विशाल थूल आदींची उपस्थिती होती.पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाहीजिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर शेकडो खेळाडू दररोज सराव करीत असले तरी तेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच मैदानावर काही ठिकाणी गिट्टी व खड्डे तसेच कचरा असल्याने व त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत आहे.
जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर असुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:10 PM
येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दररोज सकाळी व सायंकाळी मोठ्या संख्येने खेळाडू विविध मैदानी खेळांचा सराव करण्यासाठी येतात.
ठळक मुद्देखेळाडूंना त्रास : कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाºयांना साकडे