आॅनलाईन लोकमतवर्धा : अध्ययन भारतीसोबत संलग्न अॅग्रो थिएटर, वर्धा आणि बोधी नाट्य परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वी बोधी कला कार्यशाळा रोठा येथे घेण्यात आली. कलेसाठी कला की जीवनासाठी कला, यापलीकडे जाऊन ज्ञानासाठी कला या उद्देशाने प्रेरित या कार्यशाळेत नवीन विषयांवरील संहिता लेखन यावर सर्वांगीण चर्चा करण्यात आली. तसेच नाटकात प्रयोगशील निर्मिती या अनुषंगाने सखोल मांडणी केली.या दोन दिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी नाट्य व सिनेदिग्दर्शक हरीश इथापे होते. तसेच प्रसिध्द नाटककार प्रेमानंद गज्वी, नाट्य समीक्षक डॉ. सुरेश मेश्राम, नाट्य दिग्दर्शक अशोक हंडोरे (मुंबई), डॉ. शशिकांत बºहाणपुरकर (औरंगाबाद), भगवान हिरे (नाशिक), लेखक श्याम पेठकर, ज्येष्ठ नाट्यकलावंत मधू जोशी, सलीम शेख, वैदेही चौरे, जीवने (नागपूर), अमोल अढाव (अमरावती), रूपराव कामडी, राजेश गजभिये (उमरेड), राजा भगत, मामा मरघडे (यवतमाळ), प्रा. शांतरक्षित गावंडे (नेर) यांच्यासह युवा रंगकर्मीही सहभागी झाले होते.नाट्यवाचन सत्रात नवनिर्मित नाट्यसंहितांचे वाचन व चर्चा झाली. किरवंत, घोटभर पाणी, तनमाजोरी, गांधी आणि आंबेडकर अशा वेगळे आत्मभान जोपासणाºया नाट्यकृतींचे लेखक प्रेमानंद गज्वी यांची ‘छावणी’ ही नवी संहिता, श्याम पेठकर यांची ‘पुरुष गाळणाºया बायकांचा गाव’ आणि ‘तेरव’, भगवान हिरे यांचे ‘अनफेयर डिल’, सलीम शेख यांचे ‘रक्षंत रक्षिती’ या नाटकांचे तसेच प्रा. इंगोले यांच्या ‘नरपशू’ एकांकिकांचे कार्यशाळेत वाचन केले. नवसंहितांवर विस्ताराने चर्चाही करण्यात आली. शेतशिवारात पार पडलेल्या या निवासी कार्यशाळेत नाट्यविष्कारावरील चर्चेसोबत ग्रामीण जीवनाचा आनंदही सहभागी लेखक व कलावंतांनी घेतला. अध्ययन भारतीच्या युवा पथकाने ‘आठवण सावित्रीची’ हे पथनाट्यही महाराष्टÑातील ज्येष्ठ रंगकर्मीसमोर सादर केले.
नाटकांच्या नवनिर्मितीवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:36 PM
अध्ययन भारतीसोबत संलग्न अॅग्रो थिएटर, वर्धा आणि बोधी नाट्य परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वी बोधी कला कार्यशाळा रोठा येथे घेण्यात आली.
ठळक मुद्दे३९ वी कार्यशाळा : अॅग्रो थिएटर व बोधी नाट्य परिषदेचा उपक्रम