वर्धा : खाजगी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभाग, जि.प. कार्यालयात येथे रुजू झालेले प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी के. शेंडे यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. यावेळी खाजगी प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्ह्यातील मुख्याध्यापक व पदाधिकाऱ्यांची चर्चात्मक सभा झाली. सभेला संघाचे सचिव सुरेशकुमार बरे, सहसचिव शालीक झाडे, यशवंत गडवार, संजय बावणकर, पुष्पा बिरे, महेंद्र झाडे, मारोती वाघमारे, विक्रम चिडामे, चंद्रकांत वैद्य, सुधाकर टिपले, केशव अलोणी, हेमंत ठवरी, किरण जंगले, मारोती बरडे, नईमउल्ला खान यांची उपस्थिती होती. यावेळी शिक्षणाधिकारी शेंडे यांचे स्वागत करुन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यानुसार दर महिन्याच्या एक तारखेला वेतन मिळावे, हे वेतन अनियमीत अदा केल्या जाते. भविष्य निर्वाह निधीत जमा रक्कमेच्या पावत्या सन २०१५-१६ च्या आजपावेतो वेतन पथक प्राथमिककडून मिळालेल्या नाही. डी.सी.पी. एस. च्या हिशोबाच्या पावत्या अप्राप्त आहे. एस.सी. व एस.टी. प्रवर्गातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी संस्थांना परवानगी देण्यात यावी, प्लॅनमधील शाळांचे मे २०१६ चे वेतन अद्याप झाले नसल्याची मागण्या केल्या.(स्थानिक प्रतिनिधी)
शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा
By admin | Published: September 01, 2016 2:07 AM