वर्धा : प्राथमिक आरोग्य केंद्र, गिरोली येथे रुग्ण कल्याण समितीची सभा घेण्यात आली. या सभेत विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. यासह आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य व रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष संजय कामनापुरे होते. पं.स. सभापती भगवान भरणे हे प्रमुख अतिथी होते. यासह समितीचे सदस्य व गिरोलीचे सरपंच प्रमीला थुल, विवेक इंगोले, डॉ. पाल, उपसरपंच श्रीकांत लाकडे, संगीता कुमरे, निलेश गावंडे, बालविकास प्रकल्प देवळीच्या पर्यवेक्षिका गायत्री चांदेकर, आरोग्य अधिकारी प्रतिनिधी केतन बाभुळकर उपस्थित होते, आरोग्य केंद्र गिरोली अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा व अंगणवाडी सेविका यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय दाढे यांच्या हस्ते सन्मानित केले. आशा स्वयंसेविकाचे प्रथम पारीतोषिक वनिता पोराटे, द्वितीय उर्मिला वाटकर तर तृतीय गीता कांबळे ठरल्या. अंगणवाडी सेविकांमध्ये प्रथम पुरस्कार पुष्पा कामनापुरे, द्वितीय ज्योती मुन व तृतीय प्रतीभा गायकवाड यांना देण्यात आला. आरोग्य कर्मचारी नीता बनकर यांना प्रथम, भावना कोहळे द्वितीय तर चंद्रकला जाधव तृतीय आल्या. तिगारे व भावना कण्डे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. २०१५-१६ या कालावधीत कुटूंब कल्याण व राष्ट्रीय उपक्रमामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा सन्मान बहाल केला. कार्यक्रमाचे संचालन व प्रस्तावना डॉ. संजय दाढे यांनी केले. आभार सरला पारीसे यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
रूग्ण कल्याण समितीच्या सभेत उपक्रमांवर चर्चा
By admin | Published: January 05, 2017 12:41 AM