लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवडणूक प्रचार मोहिमेत सार्वजनिक स्थळावर भित्तीपत्रक लावण्यास, घोषणा लिहिण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात भंग झाल्यास कारवाईचे अधिकार नगरपालिका, निवडणूक प्रशासन यांच्याकडे देण्यात आले आहे.निवडणूक काळात राजकीय पक्षांचे व उमेदवारांचे कार्यकर्ते खासगी व सार्वजनिक इमारतींच्या भिंतीवर निवडणूक विषयक भिंतीपत्रके चिकटवून घोषणा लिहून, निवडणूक चिन्हे रंगविण्यासाठी भिंतीचा उपयोग करतात. तसेच या गोष्टी इमारतींच्या मालकांची परवानगी न घेताच केल्या जातात व त्यांना त्या अतिशय त्रासदायक ठरतात. याबाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा, १९८४ व तसेच खासगी वा सरकारी मालमत्ता विद्रुपन कायदा, १९९६ अन्वये तरतुदी पुरेशा परिणामकारक आहेत. अशा प्रकारची अनिष्ट कृत्ये करणाऱ्या पक्षांविरूध्द/ व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने मालमत्ता विद्रुपिकरणासंदर्भात पत्रा अन्वये केली आहे.निवडणूक सुरू असलेल्या कालावधीत राजकीय पक्ष वा उमेदवार यांनी त्यांच्या अनुयायांना चिन्हे लावणे, फलक लावणे, नोटीसा चिकटवणे व घोषणा लिहिणे आदींसाठी खासगी जमीन, इमारती, भिंतीचा मालकांच्या लेखी परवानगीशिवाय वापर करण्यास अनुमती देता कामा नये. तसेच राजकीय पक्ष वा उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते यांना कोणत्याही सार्वजनिक इमारतींवर आपली भिंतीपत्रके चिकटवणे, घोषणा लिहिणे, आपली निवडणूक चिन्हे रंगविणे अशाप्रकारे विद्रुपित करण्याचे अधिकार नाहीत.पोस्टर, बॅनर आदीबाबत परवानगी, जाहीर प्रचाराचा कालावधी संपेपर्यंतच्या कालावधीसाठी देण्यात येईल.जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर सदर साहित्य संबंधित उमेदवार/ पक्षांनी तात्काळ काढून टाकणे आवश्यक राहील, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. जर त्यांनी असे प्रचार साहित्य जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर काढले नाही तर त्याबाबत उपरोक्त मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा व असे प्रचार साहित्य त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने काढून टाकावे आणि ते साहित्य काढण्याकरिता आलेल्या खर्चाचा समावेश संबंधित उमेदवाराच्या खर्चामध्ये करावा, अशी सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.जुना काळ गेलावर्धा लोकसभा मतदार संघात माकपकडून अनेक निवडणूका लढलेले रामचंद्रकाका घंगारे यांचा प्रचार शहरी व ग्रामीण भागात प्रचार भिंती रंगवून केला पूर्वी केला जात होता. काकाचे शेकडो अनुयायी निवडणूक जाहीर झाली की कामाला लागून जायचे आजही शहराच्या काही भागात या भिंती इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.
निवडणूक काळात सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरणास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 9:45 PM
निवडणूक प्रचार मोहिमेत सार्वजनिक स्थळावर भित्तीपत्रक लावण्यास, घोषणा लिहिण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात भंग झाल्यास कारवाईचे अधिकार नगरपालिका, निवडणूक प्रशासन यांच्याकडे देण्यात आले आहे.
ठळक मुद्देनिवडणूक आयोगाचे निर्देश : लेखी परवानगीशिवाय भिंत रंगविणे ठरेल गुन्हा