शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

जन्म दाखल्यावरुन वाद; पालिकेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यास मारहाण

By चैतन्य जोशी | Published: September 14, 2022 5:36 PM

शासकीय कामकाजात अडथळा : शहर पोलिसात तक्रार

वर्धा : नगरपालिकेतील जन्म-मृत्यू विभागात कार्यरत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्याला दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना नगरपालिकेत घडली. याप्रकरणी १३ रोजी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

मोहम्मद आवेस मोहम्मद शकील शेख (३५) हे दिव्यांग असून पालिकेतील जन्म-मृत्यू विभागात कनिष्ठ लिपीक म्हणून नोकरीवर आहे. ते कर्तव्यावर असताना १३ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सुजित रमेश धवराठे आणि एक व्यक्ती असे दोघे जण आले आणि मुलांच्या जन्म पत्राची मागणी केली.

आवेस यांनी त्यांना थोडं थांबण्यास सांगून बाजूलाच असलेल्या मॅडमकडून प्रमाणपत्राची प्रत घेण्यास सांगितले. मात्र, दोघांनी अचानक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हेतर जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. मोहम्मद आवेस यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दाखल केली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा