लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : बोर प्रकल्पाचे पाणी रबी हंगामासाठी सोडण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. असे असले तरी वितरिका, सायपण व पाटचºयांची दुरवस्था कायम आहे. यामुळे शेतकºयांना शेतात पाणी नेताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शेवटच्या शेतकºयापर्यंत यंदाही पाणी पोहोचणार की नाही, याबाबत साशंकताच आहे.बोरधरण प्रकल्पाचा कालवा, पाटचºया, वितरिका व सायपणच्या निर्मितीला ५० वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. तेव्हा केलेल्या वितरिका सध्या गाळाने पूर्णत: बुजल्या आहे. यात वाढलेली झाडे झुडपे पाण्याचा प्रवाह रोखण्यास कारणीभूत ठरत असताना पाटबंधारे विभागाद्वारे नावापूरता जेसीबी लावून कुठे १० फुट तर कुठे २० फुट वितरिका उखरून सफाईचा देखावा करण्यात आला. सायपणपवरून शेतात ओलितासाठी पाणी नेताना शेतकºयांना पुन्हा याही हंगामात टिनपत्रे वा गोट्यांची पाळ लावावी लागेल, हे वास्तव आहे. पाटचºया पाझरत असल्याने अनेकांच्या शेतातील पिकांचे नुकसान होते. शेतकरी दरवर्षी अर्ज करतात; पण त्या पाटचºयांकडे लक्ष देण्यास अधिकाºयांना वेळ नाही. नावाला पाणी सोडणे, ते शेतकºयांनीच घेणे, कर्मचारी नसणे यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय कसा रोखला जाणार, हे एक कोडेच आहे. कर्मचाºयांची कमतरता आहे; पण धरणाचे पाणी ओलितासाठी देण्याचा मुख्य उद्देश्य ५० वर्षांतही सफल झाला नाही. अद्यापही शेवटच्या शेतकºयांच्या शेतात पाटाचे पाणी पोहोचलेलेच नाही, ही शोकांतिका आहे. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकारी तथा लोकप्रतिनिधींनी लक्ष देत संपूर्ण वितरिकांची दुरूस्त करावी, अशी मागणी आहे.मदन प्रकल्पाचे पाणी आजपासून शेतकºयांना मिळणारवर्धा - मदन प्रकल्पांतर्गत लाभक्षेत्रात येणाºया शेतकºयांना रबी पिकासाठी गुरुवारपासून पाणी सोडण्यात येत आहे. याबाबत जामणी येथील महात्मा साखर कारखाना येथे सभा घेण्यात आली. सभेला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. काळे, माधव कोटस्थाने, जि.प. महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष अशोक वैरागडे, भाजप सेलू तालुकाध्यक्ष अशोक कलोडे, पं.स. सदस्य बंडू गव्हाळे, उपविभागीय अभियंता रा.ज. राणा, स. अभियंता शारिक सोळंकी, संकेत लोखंडे, राजेश देशमुख, शाखा अभियंता धनवीज व शेतकरी उपस्थित होते..मदन तलाव प्रकल्पात १३.२६ दलघमी पाणीसाठा असून धरण १०० टक्के भरले आहे. रबी पिकासाठी ८.७४ दलघमी साठा उपलब्ध आहे. रबीचे १२९६ हेक्टर क्षेत्र गृहित धरले असून कापूस ६०० हेक्टर, गहू ३०० व चना ३९६ हे संभाव्य आहे. रबीसाठी १५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर, २३ डिसेंबर ते ३ जानेवारी, १८ ते २९ जानेवारी व १७ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत पाणी सोडले जाणार आहे. कालव्यातील गाळ व गवत काढण्यासाठी जेसीबी उपलब्ध करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. येळाकेळी जि.प. सर्कलमध्ये पाणी उपलब्ध होणार असल्याने उत्पादनात वाढ होणार आहे. सभेला सुधीर देशमुख, गौळकार, बाळासाहेब ढोडीकर, ढगे, दिलीप पिंपळे, अरुण चिचघरे व शेतकरी हजर होते.बोरधरणातून सोडणार चार वेळ पाणीबोरधरण : सिंचन विभागाद्वारे रबी हंगामात बोरधरण येथून चार वेळा पाणी सोडले जाणार असल्याची माहिती बोरधरण येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत कार्यकारी अभियंता काळे यांनी सांगितले. ही बैठक मंगळवारी झाली. यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नागपूरचे अधीक्षक अभियंता एल.पी. इंगळे, पं.स. सभापती जयश्री खोडे, जि.प. सभापती सोनाली कलोडे, हिंगणीच्या सरपंच शुभांगी मुडे, उपविभागीय अभियंता भालेराव, घोराड, बोरी, हमदापूर, हिंगणीचे शेतकरी उपस्थित होते. शेतकºयांच्या मागणीनुसार पहिले पाणी गुरूवारी सोडले जात आहे. यंदा शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाने घेतल्याचे काळे यांनी सांगितले.
वितरिका, सायपण, पाटचºयांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:29 AM
बोर प्रकल्पाचे पाणी रबी हंगामासाठी सोडण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. असे असले तरी वितरिका, सायपण व पाटचºयांची दुरवस्था कायम आहे.
ठळक मुद्देओलितासाठी कसरत कायमच : शेवटच्या शेतकºयांपर्यंत पाणी पोहोचण्याची शक्यता धूसर