४०० नागरिकांना लाभ : शिव प्रतिष्ठान समूहाचा उपक्रम लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शिव प्रतिष्ठान ग्रुपद्वारे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दत्तात्रय आरोग्य विमा कार्ड वितरित करण्यात आले. ४०० गरजू नागरिकांना या कार्डचा लाभ देण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते आ.डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. यावेळी अतिथी म्हणून न.प. बांधकाम सभापती निलेश किटे, भाजप शहर अध्यक्ष प्रशांत बुरले, मदन चावरे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हे कार्ड वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला न.प. गटनेते प्रदीप ठाकरे, नगरसेवक बंटी गोसावी, वंदना भुते, अभिषेक त्रिवेदी, विजय उईके, गोपी त्रिवेदी, नौशाद शेख, सचिन पारधे, आशिष वैद्य, अरविंद कोपरे, शरद आडे, सतीश मिसाळ, डॉ. सुनील चावरे, माजी पं.स. सदस्य फारुख शेख, अभ्यूदय मेघे, सुनील बुरांडे, अजय वरटकर, सुनील टाकळे, अन्ना चामटकर आदी उपस्थित होते. संचालन नरेश पेटकर यांनी केले. कार्यक्रमाला शिव प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. भाजपाच्या शिवार संवाद अभियानास प्रारंभ वर्धा विधानसभा क्षेत्रात आ.डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारातून भाजपचे शिवार संवाद अभियान गुरूवारी वरूड येथून प्रारंभ झाले. वरुडचे शेतकरी सुभाष कोसुरकर यांच्या शेतात हा कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन आ.डॉ. भोयर यांनी केले. अध्यक्षस्थानी सरपंच वासुदेव देवढे तर अतिथी म्हणून पं.स. सभापती महानंदा ताकसांडे, जि.प. सदस्य सुकेशनी धनवीज, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारती, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता गहलोत, मोहाडे, सुरेश नेमाडे, सुनीता ढवळे उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. बोरगाव (मेघे) येथे पांडुरंग हिवंज व रमेश धांदे यांच्या घरी संवाद अभियान पार पडले. यावेळी आ.डॉ. भोयर, जि.प. सदस्य पंकज सायंकार, पं.स. सदस्य दुर्गा ताजणे, सुनीता मेघे, सरपंच देवढे, विजय ताजणे उपस्थित होते. आ. भोयर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. सामाजिक उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य - भोयर आज आरोग्याची समस्या सर्वांनाच भेडसावत आहे. अनेकांना आरोग्याचा खर्च न परवडणारा आहे. त्यांनाही चांगले उपचार मिळावे म्हणून दत्तात्रय आरोग्य विमा कार्ड वितरित करण्यात येत आहे. ४०० लोकांना कार्ड दिले. हा उपक्रम इथेच न थांबता अविरत सुरू राहील. सामाजिक उपक्रम समाजासाठी महत्त्वपूर्ण हा वसा श्याम गायकवाड यांनी दिला आहे. त्यांच्या स्मृतिनिमित्त त्यांचा आदर्श असाच सुरू राहील, असे आश्वासन आ.डॉ. पंकज भोयर यांनी दिले. विम्यात १ लाखाचे सुरक्षा कवच दत्तात्रय आरोग्य विमा कार्ड अंतर्गत सावंगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कार्डधारकांच्या परिवारास १ लाख रुपयांचे सुरक्षा कवच मिळणार आहे. यात रुग्णालयात भरती झाल्यानंतर २४ तासानंतर कार्डचा लाभ विमा धारकाला मिळेल. हा लाभ १ लाख रूपयापर्यंत दिला जाईल. केवळ तपासणीसाठी येणाऱ्या कार्डधारकाला ओपीडीमध्ये २५ टक्के सुट दिली जाणार आहे; पण भरती रुग्णाला ही सवलत १ लाखापर्यंत मिळेल.
दत्तात्रय आरोग्य विमा कार्डचे वितरण
By admin | Published: May 28, 2017 12:30 AM