शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनतर्फे वर्धा जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 6:19 PM

कोरोना विषाणुचा चक्र तोडण्याकरीता राबविल्या जात असलेल्या कुलुपबंद अवस्थेमुळे अनेकांवर उपासमारीची पाळी आली. याची दखल घेत नाम फाउंडेशनने ग्रामस्थांना सोमवारी (ता.२०) जिवनावश्यक वस्तुच्या किटचे वाटप करुन मदतीचा हात दिला.

ठळक मुद्दे१३० परिवारंना दिली जीवनावश्यक वस्तूंची कीट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: एकेकाळी लाख मोलाची जमीन बाळगुन असणाऱ्या मिझार्पुर (नेरी) हे गाव निम्न वर्धा प्रकल्पामुळे कफल्क झाले. अशातच कोरोना विषाणुचा चक्र तोडण्याकरीता राबविल्या जात असलेल्या कुलुपबंद अवस्थेमुळे अनेकांवर उपासमारीची पाळी आली. याची दखल घेत नाम फाउंडेशनने ग्रामस्थांना सोमवारी (ता.२०) जिवनावश्यक वस्तुच्या किटचे वाटप करुन मदतीचा हात दिला.ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या नाम फाऊंडेशनचे विदभा व खानदेश वि•ाागाचे समन्वयक हरिभाऊ ईथापे, समाजसेवक संजय तिगावकर, उपविभागीय अधिकारी हरीष धार्मीक, ठाणेदार संपत चव्हाण, अ.भा. अनिसचे वर्धा जिल्हा सदस्य दशरथ जाधव, डॉ. रवींद्र सोनटक्के, उपसरपंच बाळा सोनटक्के, प्रा. नरेंद्र कोल्हे, ग्रामसेवक राजु शेंद्रे, पांडुरंग कोल्हे, अशोक भट्टड, विरेंद्र कोल्हे, दादाराव नासरे, बाबाराव नासरे यांच्या हस्ते सर्व नियमाचे पालन करुन या किटचे ग्रामस्थानच्या घरोघरी जावून वाटप करण्यात आले.बाकळी व वर्धा नदीच्या संगमामुळे वैभव संपन्न असलेल्या मिझापुर (नेरी) गावातील लाखोमोलाची जमीन गावकऱ्यांनी निम्न वर्धा धरणाकरीता कवडीमोलाने दिली. शासनाकडून मिळालेल्या अल्प मोबदल्यात पयार्यी जमीन घेता आली नाही. परिणामी १५० वैभवसंपन्न परिवारावर •ाुमीहीन व कफल्क होण्याची पाळी आली. अनेकांच्या हाताला काम देणाऱ्यांवरच उदर•ार्नाकरीता काम शोधण्याची पाळी आली. काहींना येथील प्लायवूड कारखाण्याची साथ मिळाली, काहींनी पेट्रोल पंम्प वर पेट्रोल भरण्याचे काम नाईलाजास्तव स्वीकारले तर अनेकांनी हातमजुरीवर जाणे सुरू केले. नाम फाऊंडेशनचे विदभा व खानदेश समन्वयक हरिभाऊ ईथापे यांनी दखल घेवून दुसऱ्याच दिवशी १३० गरवंतांकरीता जिवनावश्यक वस्तुंच्या किट. वाटपा करीता उपलब्ध करून दिल्या.बांधलेली घरे व गावातील स्वच्छता पाहता डोळ्यांना समृध्द दिसणाऱ्या गावातील नागरीकांच्या अंतर्गत अडचणीवर लक्ष केंद्रीत करून नाम फाऊंडेशनचे समन्वयक हरिभाऊ ईथापे यांनी प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या सोबत संपर्क साधून मदतीचा हात पुढे केला. याकरीता गावकऱ्यांच्यावतीने उपसरपंच बाळा सोनटक्के यांनी नाम फाऊंडेंशनचे आभार मानले.

मदतीचा हात सदैव पुढेच राहणारनाम ने गरजवंत शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला व याची सुरू आर्वी लगतच्या मिझार्पुर (नेरी) पासुन केली. यानंतर मेळघाट, चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती आदि ठिकाणी सुध्दा जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात नाम फाऊंडेशनच्या मदतीचा हात सदैव पुढेच राहणार आहे असे विदभा व खानदेश समन्वयक हरिष ईथापे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस