वर्धा-कापसी मार्गावर काळीपिवळीला जोर लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांची दैनावस्था झाली आहे. यामुळे परिवहन महामंडळाचे वेळापत्र कोलमडणे नित्याचेच झाले आहे. हा सर्व प्रकार अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. यामुळे वर्धा-कापसी मार्गे राळेगाव रस्त्यावर खासगी प्रवासी वाहतूक वाढली आहे. काळी-पिवळी, आॅटोरिक्षांत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जात आहे. याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. अधिक प्रवासी घेऊन जाण्याच्या प्रयत्नात प्रवासी वाहनात कोंबून नेले जातात. वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरण्याच्या या प्रकारामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्धा ते कापसी मार्गावर धावणाऱ्या काळी-पिवळी चालकाकडून नियमांची पायमल्ली केली जाते. प्रवाशांना वाहनात बसायला जागा नसली तर गाडीच्या पाठीमागे असलेल्या पायदानावर उभे करण्यात येते. या पायदानावर चार ते पाच प्रवासी उभे असतात. ही जीवघेणी प्रवासी वाहतूक दिवसाही सुरू असते. आॅटोचालक देखील क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनात कोंबुन नेतात. प्रवाशांची जीवघेणी वाहतूक जोमाने सुरू आहे.
जिल्ह्यात अवैध वाहतुकीला उधाण
By admin | Published: June 30, 2017 1:51 AM