राजेश भोजेकर वर्धा शहरातील सुमारे ३० हजार वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरणने वर्धा शहरात सात वितरण केंद्र उघडले आहे़ मात्र सातपैकी तब्बल चार केंद्रातील अभियंते नागपूरहून ये-जा करीत असल्यामुळे वर्धा शहरात वीज वितरण कंपनीचा डोलाराच ढासळल्यागत स्थिती निर्माण झाली आहे़पूर्वी या वितरण केंद्रामध्ये स्थानिक अभियंते व कर्मचारी कार्यरत होते. बदल्यांमुळे नवीन अभियंते मुख्यालयी राहत नसल्यामुळे वीज ग्राहकांच्या समस्यांमध्ये अधिकची भर पडत आहे़ शहरात फ्यूज कॉल अटेन्ड करण्याची सुविधा नाही़ नियमानुसार तक्रारींचे निवारण अवघ्या तीन तासात व्हायला पाहिजे़ मात्र या नियमाची महावितरण अधिकाऱ्यांनी सपशेल वाट लावली आहे़ या विभागावर कुणाचाही वचक नसल्यामुळे वीज ग्राहक पूर्णत: वाऱ्यावर आहे़वर्धा शहरातील वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारणासाठी प्रत्येक वितरण केंद्रात एक वाहन अपेक्षित आहे़ मात्र एकाच वाहनाच्या बळावर ग्राहकांना सेवा देण्याची कसरत ही विभाग करीत आहे. वरिष्ठांचे दुर्लक्ष आणि अधिकाऱ्यांचे उंटावरून शेळ्या हाकणे हाच प्रकार याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे़ब्रेक डाऊन झाला व शट-डाऊन झाला तर अधिकारी व कर्मचारी वेळेवर पोहचत नाही़ परिणामी वीज पुरवठा सुरू होण्यास बराच विलंब लागत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.वितरण केंद्र रात्रीला बंदवर्धा शहरातील वीज वितरण केंद्र तीन पाळीत चालायला पाहिजे़ असा नियम आहे़ मात्र रात्रीला हे केंद्र बंदच असते़ यामुळे वीज ग्राहकांना २४ तास सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. रात्रीला वीज गेली तर ती परत येण्यासाठी बराच काळ ताटकळत राहावे लागतात.ग्राहक सुविधा केंद्र असुविधेचेवर्धा शहरातील ग्राहक सुविधा केंद्र कार्यरत आहे़ तिथे दोन कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहे़ जुन्या कर्मचाऱ्यांना बदलवून नवीन तीन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे़ या नवीन कर्मचाऱ्यांना नियमांची जाणीव नसल्यामुळे ग्राहकांना नाहक हेलपाट्या माराव्या लागत आहे़ वास्तविक, कर पावतीवर मालकी हक्काचे कागदपत्र असले तरी वीज कनेक्शन देता येणे शक्य आहे़ मात्र आगाऊ कागदपत्रे मागावून ग्राहकांना कनेक्शन देण्यास दिरंगाई केली जात असल्याचे चित्र आहे़रात्रीची तक्रारच नोंद होत नाहीया वितरण केंद्रामध्ये रात्रीला एखाद्या ग्राहकाने तक्रार नोंदविली तर त्याची नोंदच होत नसल्याची माहिती आहे़ यामुळे ग्राहकांना त्याची दखल होईल वा नाही याचीही शाश्वती राहात नसल्याची विदारक स्थिती आहे.ग्राहक सुविधा केंद्राबाबत ग्राहकच अनभिज्ञभांडुक व पुणे येथे केंद्रीय ग्राहक सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे़ ग्राहकांना १८००२३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदविण्याची सुविधा आहे़ मात्र याबाबत वीज वितरण कंपनीने जनजागृतीच केली नसल्यामुळे ग्राहकांना याची माहितीच नसल्याची माहिती आहे़तक्रारींना केराची टोपलीवीज ग्राहकांकडून असलेल्या तक्रारींचा निपटारा केला जात नसल्याची गंभीर बाबही लोकमतच्या निदर्शनास आली आहे़ तक्रारींना कचराकुंडी दाखविली जात असल्याची गंभीर माहिती असल्यामुळे वीज ग्राहकांना खरच न्याय मिळतो काय हा प्रश्नच आहे़आऊटसोर्सिंगची पदे नसताना ठेकेदारामार्फत कामेआऊट सोर्सिंगची कोणतीच पदे मंजूर नसतानाही अमरावती येथील एका मर्जीतच्या सिक्युरिटी कंपनीच्या केठेकदाराला ३० लोक लावण्याचे काम दिले आहे़ मात्र ही मंडळी ग्राहकांना सेवा देणे दुरच उलट अधिकाऱ्यांचे दलाल बनल्याची आतील गटातील माहिती आहे़ नियमित कर्मचाऱ्यांना डावलून या मंडळीकडून काम करवनू घेतले जात असल्याची धक्कादायक माहिती आहे़
वर्धेत वीज वितरणचा डोलारा ढासळला
By admin | Published: June 28, 2014 12:31 AM