लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक आंतरजिल्हा व आंतर राज्य, सार्वजनिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, मनोरंजनाचे कार्यक्रम, धार्मिक ठिकाणे, सलून, ब्यूटी पार्लर, सिनेमागृहे इत्यादी दुकाने वगळता इतर दुकाने सुरु ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र इतर सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या कालावधीतच सुरु राहतील. तसेच दुकाने सुरु ठेवण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणाव्या असे आवाहन केले आहे.वर्धा जिल्हा ग्रीन झोनमध्ये येत असला तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणुन जिल्हाधिकारी यांनी काही प्रतिबंधात्मक निर्णय घेतले आहे. हे निर्णय असे आहेत.1. रेल्वे मधील सर्व प्रवासी वाहतुक बंद राहील.2. आंतर राज्य व आंतर जिल्हा सार्वजनिक बस वाहतूक सेवा पुर्णत: बंद राहतीलतथापि जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरु करता येईल व बस डेपोच्या क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने डेपो सुरु करता येईल. मात्र सदर वाहतूक फक्त जिल्ह्यांतर्गत करण्यात येईल. जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास बंदी राहील.3. वैद्यकीय कारणे वगळता आंतरराज्यीय वाहतूक पूर्णत: बंद4. सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण, कोचिंग संस्था पूर्णत: बंद राहतील परंतु ऑनलाईन दुरुस्थ पध्दतीने अभ्यासक्रम चालू ठेवता येईल.5. हॉस्पीटलीटी सेवा पूर्णत: बंद राहतील. केवळ पोलीस वैद्यकिय कर्मचारी लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या व्यक्ती यांच्याकरिताच सदर सेवा चालू राहतील6. सर्व सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्पलेक्स, व्यायामशाळा, व क्रिडा कॉम्पलेक्स, जलतरण तलाव, मनोंरजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्ली हॉल व इतर तत्सम ठिकाणे बंद राहतील7 सर्व सामाजिक /राजकीय / खेळ /करमणुक /शैक्षणिक /सांस्कृतीक /धार्मिक कार्य/ इतर मेळावे.8 सर्व /धार्मिक स्थळे/ पुजेची ठिकाणे भाविकासाठी बंद ठेवण्यात येतील. तसेच /धार्मिक कार्यक्रम, परिषदा इत्यादीवर बंदी राहील.9 सलुन, ब्युटी पार्लर, स्पा, पानटपरी, तंबाखूजन्य पदार्थ विक्रीची दुकाने व मॉल या सेवा पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.10 लॉकडाऊन काळात जिल्ह्यामध्ये जिल्ह्याबाहेरुन कुठूनही भाजीपाला, फळे, चिकन, मटन व मासे यांच्या वाहतुकीस बंदी राहील. तथापी कांदा, बटाटा, अद्रक, लसुन व फळे ह्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध नाही. मात्र जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांना अनलोडींग पॉईंटचा उपयोग करणे अनिवार्य राहील.
ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्हयातील बहुतांश दुकाने सुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 7:08 PM
वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक आंतरजिल्हा व आंतर राज्य, सार्वजनिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, मनोरंजनाचे कार्यक्रम, धार्मिक ठिकाणे, सलून, ब्यूटी पार्लर, सिनेमागृहे इत्यादी दुकाने वगळता इतर दुकाने सुरु ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे.
ठळक मुद्देसकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगीलॉकडाऊनच्या काळात नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाईगर्दीच्या ठिकाणाची दुकाने आळीपाळीने सुरु राहणारसलून, ब्युटी पार्लर, स्पा, पानटपरी व तंबाखूजन्य पदार्थांची दुकाने बंद