लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भ वनवासी कल्याण आश्रम जिल्ह्याच्यावतीने माहेश्वरी भवन येथे जनजाती संमेलन पार पडले. उद्घाटन सत्रात वनवासी कल्याण आश्रम पश्चिम क्षेत्र सहसंघटन मंत्री संजय कुलकर्णी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे, विदर्भ वनवासी कल्याण आश्रमचे जिल्हाध्यक्ष महेश बुधवानी, आयोजन समितीचे अध्यक्ष शरद आडे, संयोजक लक्ष्मण मरसकोल्हे उपस्थित होते.वनवासी कल्याण आश्रमच्यावतीने संपूर्ण देशामध्ये १९५२ पासून वसतिगृहाच्या माध्यमातून आदिवासी समाजात शिक्षणाचे महत्त्व पोहचविण्याचे काम सातत्याने सुरू आहे. आदिवासी समाजाने आल्या रूढी परंपरा जोपासल्या आहेत, असे संजय कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी संजय कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रास्ताविक धनंजय बल्लाळ यांनी केले. संचालन करीत उपस्थितांचे आभार प्रकाश देशपांडे यांनी मानले.वनवासी कल्याण आश्रम देशातील दऱ्या-खोऱ्यात राहणाऱ्या शेवटच्या आदिवासी समाजासाठी कार्य करीत असल्याची माहिती संघटनमंत्री विनायक सुरतने यांनी दिली. आपसातील सर्व मतभेद विसरून सर्व जनजाती समाजाने एका मंचावर येऊन समाजाच्या हितासाठी कार्य करावे, असे सत्राचे अध्यक्ष विदर्भ वनवासी कल्याण आश्रमचे प्रांत अध्यक्ष विनायक ईरपाते म्हणाले.याप्रसंगी समाजातील उच्च शिक्षण घेत समाजकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात डॉ. पुरूषोत्तम प्रत्येके, डॉ. दीपश्री प्रत्येके, मिनाखी सुरपन, विजय उईके, रूख्मिनी मसराम, सलाम यांचा समावेश होता. संचालन प्रा. प्रफुल बनसोड यांनी केले तर आभार जावडेकर यांनी मानले. आयोजनाकरिता सर्वांनी सहकार्य केले.
विदर्भ वनवासी कल्याण आश्रमचे जिल्हा जनजाती संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 10:19 PM
विदर्भ वनवासी कल्याण आश्रम जिल्ह्याच्यावतीने माहेश्वरी भवन येथे जनजाती संमेलन पार पडले. उद्घाटन सत्रात वनवासी कल्याण आश्रम पश्चिम क्षेत्र सहसंघटन मंत्री संजय कुलकर्णी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
ठळक मुद्दे विदर्भ वनवासी कल्याण आश्रम