लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अधिवेशन शिक्षकांच्या प्रचंड उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी शिक्षक आमदार व्ही.यु. डायगव्हाणे, स्वागताध्यक्ष श्रावण बरडे, अनिल कठाणे, प्रमुख अतिथी सुधाकर अडबाले, प्रा.डॉ. विलास ढोणे, सतीश जगताप, नुरसिंग जाधव, आनंद कारमोरे, दत्तात्रय मिर्झापुरे, जयप्रकाश थोटे, जनता शिक्षक मंडळाचे अध्यक्ष रवी शेंडे, सुरेश बरे यांची उपस्थिती होती.प्रमुख वक्ते जि.प. कर्मचारी महासंघाचे अशोक थूल यांनी सातच्या वेतन आयोग शिफारशी व तो राज्य कर्मचाºयांना लागू करण्याबाबत सध्यास्थिती या विषयावर सविस्तर विवेचन केले. जुलै महिन्यात सामव्या वेतन आयोगाच्या बाबतीत एक सभा झाली होती. ज्याचे आयोजन राजपत्रित अधिकारी महासंघाने केलेले होते. आज फेब्रुवारी महिना उजाडला. पण बक्षी समितीला मंत्रालयात बसायला जागा नाही. यावरून सरकारचे चरित्र समजून घेतले पाहिजे. सातव्या वेतन आयोगाबाबत जे सरकारचे धोरण आहे, ते त्यांच्या भांडवली चरित्राचा आवर्षणअभावी परिणाम आहे.व्ही. यु. डायगव्हाणे यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या विविध आंदोलनाची माहिती दिली व वर्धा जिल्हा संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. अधिवेशनात संघटनेचे हितचिंतक, पदाधिकारी स्व.वसंतराव दुम्पलवार, व्ही.के. पांडे, अशोक झोटींग, अण्णासाहेब घुडे, ना.स. फरांदे, अध्यक्ष विधान परिषद यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. अधिवशेनात एकूण २१ विषयावर चर्चा होवून पुढील आंदोलनाची दिशा पाठविण्यात आला.
विमाशिचे जिल्हा अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:02 AM
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अधिवेशन शिक्षकांच्या प्रचंड उपस्थितीत झाले.
ठळक मुद्देव्ही.यू. डायगव्हाणे : एकूण २१ विषयांवर चर्चा