शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

जागतिक अपंगदिनी मोबदल्यासाठी दिव्यांगांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:36 PM

जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रविवारी स्थानिक बजाज चौक येथून सकाळी १२ वाजताच्या सुमारास प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला. दिव्यांग बांधवांचा हा मोर्चा दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शांतीनगर भागातील मिनल इथापे यांच्या निवासस्थानी पोहोचला.

ठळक मुद्देबजाज चौक ते शांतीनगरपर्यंत मोर्चा : काम करूनही सहा महिन्यांपासून मानधन नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रविवारी स्थानिक बजाज चौक येथून सकाळी १२ वाजताच्या सुमारास प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला. दिव्यांग बांधवांचा हा मोर्चा दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शांतीनगर भागातील मिनल इथापे यांच्या निवासस्थानी पोहोचला. या वेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांना केलेल्या कामाचा मोबदला देण्याची मागणी रेटत ठिय्या दिला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.कौशल्य विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर सहा महिन्यांपर्यंत प्रती महिना तीन हजार रुपये प्रमाणे काम दिले. मिनल इथापे या कर्मचारी असलेल्या संस्थेच्यावतीने देण्यात आलेले काम दिव्यांग बांधवांनी पूर्णही केले. मात्र, या कामाचा एकाही महिन्याचा मोबदला देण्यात आला नाही. परिणामी, दिव्यांग बांधवांनी काम बंद केले. मोबदल्याबाबत वारंवार विचारणा केली असता उडवा-उडवीचे उत्तरे दिल्या जात असल्याचा आरोप करीत कामाचा तात्काळ मोबदला देण्यात यावा, अशी मागणी लावून धरली.स्थानिक बजाज चौक येथून काढण्यात आलेल्या मोर्चाने सोशालिस्ट चौक, शिवाजी चौक, धंतोली चौक, वंजारी चौक, सिंदी (मेघे) नाका चौक होत मिनल इथापे यांचे निवासस्थान गाठले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी इथापे यांच्या घरासमोर सुमारे तासभर ठिय्या देत संबंधितांशी चर्चा केली. मात्र, चर्चेअंती कामाचा मोबदला देण्याबाबत समाधानकारक तोडगा न निघाल्याने आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा फसवणुकीची तक्रार करण्याकरिता रामनगर पोलीस कचेरीकडे वळविला. आंदोलनाचे नेतृत्त्व हनुमंत झोटींग, राजेश सावरकर, विकास दांडगे यांनी केले. आंदोलनात सिद्धार्थ उरकुडे, प्रमोद कुरटकर, शैलेश सहारे, धनराज घुमे, सुनील मिश्रा, राजेश पंपनवार, चंद्रशेखर देशपांडे, अजय भोयर यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.काम करून घेतलेल्यांना मोबदला मिळणे क्रमप्राप्त आहे. आपण जिल्ह्यात उपक्रम राबविणाºया हर्षल ग्रामीण बहूउद्देशीय संस्था चंद्रपूरचे केवळ एक कर्मचारी म्हणून काम पाहिले. सदर संस्थेनेही दिव्यांग बांधवांना त्यांच्या कामाचा मोबदला तात्काळ दिला पाहिजे.- मिनल इथापे, कर्मचारी, हर्षल ग्रामीण बहूउद्देशीय संस्था केंद्र, वर्धा.२४० दिव्यांगांना प्रशिक्षणकौशल्य विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील २४० दिव्यांग बांधवांना प्रशिक्षण देत त्यांच्याकडून काम करून घेतले;पण त्यांना एकाही महिन्याचा कामाचा मोबदला देण्यात आला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.बंदोबस्तामुळे पोलीस छावणीचे स्वरूपआंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून नये म्हणून आंदोलनस्थळी रामनगर पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकाचे जवान तैनात होते. पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तामुळे काही काळाकरिता वायफड मार्गाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.