शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

दिव्यांगांचा वर्धा जि.प. सीईओंना तासभर घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 3:15 PM

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला; पण संबंधितांकडून मागण्यांच्या निवेदनांना केराची टोपलीच दाखविली जात असल्याचा आरोप करीत गुरूवारी प्रहारच्या नेतृत्त्वात संतप्त दिव्यांग बांधवांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांना त्यांच्याच दालनात चक्क तासभर घेराव ...

ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन दिव्यांग बांधवांच्या वाट्याचा ३ टक्के निधी खर्च करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला; पण संबंधितांकडून मागण्यांच्या निवेदनांना केराची टोपलीच दाखविली जात असल्याचा आरोप करीत गुरूवारी प्रहारच्या नेतृत्त्वात संतप्त दिव्यांग बांधवांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांना त्यांच्याच दालनात चक्क तासभर घेराव घातला. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती आंदोलनकर्त्या दिव्यांग बांधवांनी घेराव आंदोलन मागे घेत जि.प. कार्यालयासमोर धरणे दिले.बिज भांडवल योजनेतून कर्जपुरवठा दिव्यांगांना होत नसून तो तात्काळ करण्यात यावा. दिव्यांगांना घरकुल योजनेत प्राधान्याने सामावून घेत त्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात यावा. स्वयंरोजगारासाठी २०० चौ.फु. जागा दिव्यांग बांधवांना देण्यात यावी. शिवाय तसा ठराव जि.प. व इतर कार्यालयात घेण्याच्या सूचना करण्यात याव्या. ग्रा.पं., पं.स., जि.प. स्थरावर दिव्यांग बांधवांच्या वाट्याचा असलेला ३ टक्के निधी खर्च करण्यासंदर्भात जिल्ह्यात कुठेही समिती स्थापन करण्यात आली नाही. ती तात्काळ करण्यात यावी आदी मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी रेटून धरल्या होत्या. मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघेपर्यंत आम्ही दालनातून बाहेर जाणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. सदर आंदोलनामुळे जि.प. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली होती. आंदोलनादरम्यान दिव्यांग बांधवांनी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. यावेळी आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्यांनी जि.प. समाज कल्याण अधिकारी  ए. आर. रामटेके यांंच्यासह जि. प. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. सुमारे तासभर झालेल्या सकारात्मक चचेर्अंती आंदोलनकर्त्यांनी घेराव मागे घेत जि.प. कार्यालयासमोर धरणे दिले.

टॅग्स :Governmentसरकार