शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

११४ ग्रंथालयातील २०८ कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 5:00 AM

खिशात पैसा नसल्यामुळे मुलांना कपडे, फटाके कसे घेणार, दिवाळीचा सण कसा साजरा करायचा हा यक्षप्रश्न तुटपूंजे मानधन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. वर्धा जिल्ह्यात ह्यअह्ण दर्जाची ६, ह्यबह्ण दर्जाची २१, ह्यकह्ण दर्जाची ३० आणि ह्यडह्ण दर्जाची ५७ अशी एकूण ११४ वाचनालये आहेत. या ग्रंथालयांमध्ये अत्यल्प पगारात ११४ ग्रंथपाल, ३३ लिपीक आणि ६१ शिपाई असे एकूण २०८ कर्मचारी अत्यंत मेहनतीने वाचनालये चालवून विद्यादानाचे काम करतात.

ठळक मुद्देआठ महिन्यांपासून वेतनाविना : कुटुंबीयांवर उपासमारी

अरूण फाळकेलोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : वाचनालये विद्यादानाचे पवित्र मंदिरे आहेत. पुस्तके खरा गुरू, मित्र व मार्गदर्शक आहे. ज्यांच्याकडे नाही पुस्तकांचे कपाट ते होतील भुईसपाटह्ण अशा सुभाषितांनी ज्या ग्रंथालयाची महिमा गायली जाते. अशा वर्धा जिल्ह्यातील ११४ ग्रंथालयातील २०८ कर्मचाऱ्यांना आठ महिन्यापासून पगार (मानधन) नसल्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे चित्र आहे.खिशात पैसा नसल्यामुळे मुलांना कपडे, फटाके कसे घेणार, दिवाळीचा सण कसा साजरा करायचा हा यक्षप्रश्न तुटपूंजे मानधन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. वर्धा जिल्ह्यात ह्यअह्ण दर्जाची ६, ह्यबह्ण दर्जाची २१, ह्यकह्ण दर्जाची ३० आणि ह्यडह्ण दर्जाची ५७ अशी एकूण ११४ वाचनालये आहेत. या ग्रंथालयांमध्ये अत्यल्प पगारात ११४ ग्रंथपाल, ३३ लिपीक आणि ६१ शिपाई असे एकूण २०८ कर्मचारी अत्यंत मेहनतीने वाचनालये चालवून विद्यादानाचे काम करतात. अ दर्जाच्या वाचनालयाला वार्षिक ७ लाख २० हजार, तालुका ह्यअह्ण दर्जाच्या ग्रंथालयाला ३ लाख ८४ हजार, तालुका ह्यबह्ण दर्जाच्या वाचनालयाला २ लाख ८८ हजार, इतर ह्यबह्ण दर्जाच्या वाचनालयाला १ लाख ९२ हजार, तालुका ह्यकह्ण दर्जाच्या वाचनालयाला १ लाख ४४ हजार तर ह्यडह्ण दर्जाच्या वाचनालयाला ३० हजार रुपये वार्षिक अनुदान शासनातर्फे देण्यात येते. ५० टक्के अनुदानाचा पहिला हप्ता सप्टेंबरच्या शेवटी तर ५० टक्के अनुदानाचा दुसरा हप्ता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात यावा, असे शासकीय संकेत आहे. या प्राप्त अनुदानातून कर्मचाऱ्यांच्या पगारावर ५० टक्के खर्च करणे, संस्थाचालकांना बंधनकारक आहे. उरलेल्या ५० टक्क्यांपैकी अर्धी रक्कम पुस्तके खरेदी आणि उर्वरित रक्कमेतून वाचनालय, इमारत भाडे, विद्युत खर्च, मासिके व वृत्तपत्र खरेदी, स्टेशनरी, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय सण साजरे करणे, ऑडिट खर्च , प्रवास खर्च व सभा खर्च करावा लागतो. मिळणाऱ्या अत्यल्प अनुदानामध्ये जमा खर्चाचा ताळमेळ जुळविणे, संस्था चालकांसाठी तारेवरची कसरत आहे. एक समाजकार्य म्हणून गोर-गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी संस्थाचालक आणि कर्मचारी समन्वय साधून अनेक वर्षांपासून वर्धा जिल्ह्यात वरील वाचनालये चालविली जात आहेत.स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचा ओढा वाचनालयांकडे सध्या वाढलेला आहे. सप्टेंबर महिन्यात मिळणारे हे अनुदान प्राप्त न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी पगाराविना अंधारात जाणार आहे. ५० टक्के अनुदानाचा हा पहिला हप्ता शासनाने दिवाळीपूर्वी द्यावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.५० टक्के अनुदान अप्राप्तकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च २० पासून बंद ठेवण्यात आलेली वाचनालये १५ ऑक्टोबरपासून काही अटी-शर्तीवर सुरू करण्यात आली आहेत. ग्रंथालये सुरू झालीत; पण ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पहिल्या टप्प्याचे ५० टक्के शासन अनुदान मात्र, अद्याप ग्रंथालयाला प्राप्त झाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार कोठून व कसा द्यायचा हा प्रश्न वाचनालये चालविणाऱ्या संस्थांना निर्माण झाला आहे.कोरोनामुळे शासन आर्थिक अडचणीत आले आहे. पहिल्या टप्प्यातील ५० टक्के अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात यावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.- नितीन सोनवणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी.

टॅग्स :libraryवाचनालय