शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

खासदार रामदास तडस यांच्या गावात साजरी झाली दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:48 PM

वर्धा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रामदास तडस यांच्या मूळ गावी नागरिकांनी भव्य मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत आकाशही प्रकाशमय केले.

ठळक मुद्देगावातून लाईव्ह रिपोर्टिंग । देवळीत ढोल-ताशाच्या गजरात निघाली मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : वर्धा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रामदास तडस यांच्या मूळ गावी नागरिकांनी भव्य मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत आकाशही प्रकाशमय केले.रामदास तडस यांनी यापूर्वी २०१४ ला लोकसभा निवडणुकीत २ लाख २५ हजार मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला होता. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा विजय संपादित केल्याने देवळीकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांचा हा आनंद शहरातील चौकाचौकांत दिसून आला. कुस्तीच्या लाल मातीत विरोधकाला लोळवत देवळीचा नावलौकिक करणारे रामदास तडस आता पुन्हा एकदा भारताच्या सर्वोच्च सभागृहात जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी ढोल-ताशाच्या निनादात मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला.रामदास तडस यांच्या व्यक्तिमत्त्वाची सुरूवात कुस्ती खेळातून झाली. कुस्ती स्पर्धेत त्यांनी सलग चारवेळा विदर्भ केसरीचा बहुमान पटकाविला. यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला दिवसेंदिवस बहर येत गेला. देवळीचे ज्येष्ठ नेते व स्वातंत्र्य सेनानी मोतीलालजी कपूर यांची नगरपालिकेमध्ये असलेली ३५ वर्षांची एकहाती राजवट उलथवून देवळीचे नगराध्यक्षपद भूषविले. राजकीय महत्त्वाकांक्षा व प्रबळ इच्छाशक्ती असल्याने त्यांना वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. यातही सलग दोनदा ते विजयश्री झाले. महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी २०१४ मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली. यातही त्यांना भरघोस मताने मतदारांनी निवडून दिले. आता पुन्हा दुसऱ्यांदा तेवढ्याच मताधिक्क्याने निवडून देत सभागृहात पाठविले. आजच्या या विजयानिमित्त नगरपालिकेचे शिक्षण सभापती नंदू वैद्य यांच्या घरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. खासदार तडस यांच्या पत्नी शोभा तडस, नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, नगरसेविका कल्पना ढोक, सारिका लाकडे, सुनीता ताडाम, सुनीता बकाणे, संध्या कारोटकर, पं. स. उपसभापती मारोती लोहवे यांच्यासह शहरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल