शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

महिलांनो संस्कृतीशी नातं तोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:45 PM

समाजाने आपला आदर करावा असे वाटत असेल तर संस्कृतीशी नातं तोडू नका. कारण आपल्या संस्कृतीत स्त्रिया या पूर्ण कपड्यात सुंदर दिसतात असे म्हटले आहे.

ठळक मुद्देसिंधुताई सपकाळ : नारी शक्ती सन्मान कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतहिंगणघाट : समाजाने आपला आदर करावा असे वाटत असेल तर संस्कृतीशी नातं तोडू नका. कारण आपल्या संस्कृतीत स्त्रिया या पूर्ण कपड्यात सुंदर दिसतात असे म्हटले आहे. त्यामुळे ही नाळ जोडून ठेवा, असे मत प्रसिद्ध समाजसेविका व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केले. येथील रा.सु. बिडकर महाविद्यालयात आयोजित महिला दिन सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.वर्धा जिल्हा आशीर्वाद महिला नागरी बँक व ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कौटुंबिक जबाबदारी सांभाळीत समाजात उल्लेखनीय कार्य करणाºया महिलांचा गौरव कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते केले. अध्यक्षस्थानी डॉ.प्रा. उषा थुटे तर विशेष अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, हिंगणघाट, प्रसिद्ध लेखिका डॉ. पद्मरेखा धनकर, भाजप जिल्हाध्यक्ष अर्चना वानखेडे, नगरपरिषद सदस्य अनिता माळवे, छाया सातपुते, उत्कृष्ट महिला शेतकरी नीता सावदे, जानराव राऊत, प्रा बी.जी. आंबटकर, समुद्रपुर नगरपंचायत अध्यक्ष शीला सोनारे, श्रद्धा कुणावार, रंजना थुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.संस्थेच्यावतीने सिंधुताईंचा सत्कार उषा थुटे यांनी केला. सत्काराला उत्तर देताना सिंधुताई यांनी अनेक दाखले देत महिलांनी सक्षम होण्यासाठी घराबाहेर पडले पाहिजे. घरी आपली कोणीतरी वाट पाहते याचे भानही ठेवले पाहिजे. आजच्या परिस्थितीवर भाष्य केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते कविता घोडे, मयुरी देशमुख, राजश्री विरुळकर, प्रतिभा भानखेडे, अल्का भूगुल, संगीता इंगळे, पद्मरेखा धनकर, नीता सावदे, श्रेया केने, स्नेहल कुबडे, माया चाफले, वेदांती घाटे, अर्चना देव, शीला सोनारे, राजश्री झोटिंग, ज्योती हेमने, प्रांजली डाखोरे, श्रद्धा कुणावार, शुभांगी डांगे यांचा सत्कार केला.अध्यक्षीय भाषणातून थुटे यांनी महिलांच्या उन्नतीसाठी दोन्ही संस्था सतत कार्य करीत राहील असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन लीना शेंडे, मानपत्र वाचन प्रांजली डाखोरे, प्रास्ताविक मनीषा रिठे यांनी केले. स्वागतगीत विजय गावंडे यांनी सादर केले. आभार माधुरी विहिरकर यांनी मानले. कार्यक्रमाला शीतल ठाकरे, सपना अवचट, इशा ढोबळे, कल्पना ढोले, सविता आंबटकर, जयश्री तडस, सुरेश डंबारे, शरद विहिरकर, राजू निखाडे, शेखर कुटे, छत्रपती भोयर, ज्ञानेश्वर चौधरी, आशिष भोयर, अभिजित डाखोरे, सतीश चौधरी यांनी सहकार्य केले. सखी मंच ग्रुप आणि विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.