लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विविध मागण्यांसाठी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. याच उपोषणाचा एक भाग म्हणून शुक्रवारी भीम टायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या रिमझीम पावसाची तमा न बाळगता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे देत बुरा मत ‘देखो-कहो-सुनो’ आंदोलन केले.दिल्ली येथील जंतर-मंतर येथे संविधानाच्या प्रती जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. सनातन संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी. झोपडपट्टीवासीयांना जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे. जिल्ह्यातील गरजुंना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यात यावा. स्वच्छता अभियान अंतर्गत शौचालय योजना वर्धा जिल्ह्यात प्रशासनाद्वारे अर्धवट राबविण्यात आले असून त्याची पूर्तता करण्यात यावी. एससी, एसटी, एनटी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप हटपणाऱ्या संस्थाचालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांसाठी २२ आॅगस्टपासून भीम टायगर सेनेच्यावतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सदर आंदोलनाला सहा दिवसांचा कालावधी लोटूनही मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी कुठलेही ठोस पाऊल उचलल्या जात नसल्याचा आरोप करीत आज भीम टायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे देऊन बुरा मत ‘देखो-कहो-सुनो’ आंदोलन केले. या आंदोलनात भीम टायगर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पवनार येथे रास्तारोकोपवनार : संविधानाच्या प्रती जाळणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागण्यासाठी आज भीम टायगर सेनेच्यावतीने वर्धा-नागपूर महामार्गावर पवनार येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व भीम टायगर सेनेचे तालुका उपप्रमुख विशाल नगराळे यांनी केले. भीम टायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सुमारे अर्धातास रास्तारोको आंदोलन केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात रवींद्र चाटे, नीरज नगराळे, अनुप नगराळे, नितीन कवाडे, जीवन चाटे, अश्विनी कवाडे, सागर वैद्य, विक्रम वैद्य, उमेश नगराळे, अक्षय पाटील, रंजित नगराळे, पूनम नगराळे, सुनंदा जिंदे, सविता नगराळे, वैभव निखाडे आदी सहभागी झाले होते.
बुरा मत ‘देखो-कहो-सुनो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 12:02 AM
विविध मागण्यांसाठी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. याच उपोषणाचा एक भाग म्हणून शुक्रवारी भीम टायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या रिमझीम पावसाची तमा न बाळगता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे देत बुरा मत ‘देखो-कहो-सुनो’ आंदोलन केले.
ठळक मुद्देभीम टायगर सेनेचे आंदोलन : गांधी पुतळ्यासमोर दिले धरणे