लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चार वर्ष दहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात आले होते. त्यानंतर सोमवार १ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्याच्या भूमिवर पाय ठेवला. मोदींची सोमवारची सभा ऐकण्यासाठी लोकसभा मतदार संघातून ढोल-ताशासह तरूण पोहचले होते. प्रत्येकाच्या जवळ भाजप, शिवसेना, रिपाईचा झेंडा व मोदींचे मुखवटे होते. तर काहींनी तर ‘मै भी चौकीदार हुं’ असा मजकूर लिहून असलेले टी-शर्ट परिधान केले होते.यात तरूणी आणि महिलांचाही समावेश होता. हिंदी भाषिक तरूण मतदार मोठ्या संख्येने मोदींचा जयजयकार करण्यासाठी आले होते. मोदींच्या सभेसाठी एकाच वेळी तीन हेलिकॉप्टर वर्धेच्या आकाशातून गेले. याचे कुतूहल दुपारी १२ वाजता शाळा सुटल्यानंतर घराकडे जाणाऱ्या शाळकरी मुलांनाही वाटले. सभास्थळी ढोल वाजवून मोदींच्या सोबत प्रतिसाद देणारे जसे तरूण होते. तसेच इतरही मतदार होते. यावेळी सभेच्या व्यासपीठावर सेना, भाजप, रिपाईचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या कवितांनी उपस्थित जनसमुदायाला हसू आवरणे कठीण झाले होते. सभा स्थळी उपस्थित तरुणांसह वृद्धांनी त्यांच्या कवितांचा आस्वाद घेतला. आठवले यांनी आपल्या हटके स्टाईलमध्ये राहुल गांधीसह रामदास तडसांवर कविता सादर केली. भाजप उमेदवार रामदास तडस यांना वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर सभेतच मोदींनी शुभेच्छा दिल्या. तर मुख्यमंत्र्यांनी मतदारांना त्यांना गिफ्ट देण्याचे आवाहन केले. ४२ डिग्री तापमानात सभास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. तसेच कुणी आपल्या लहान मुला-मुलींनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखविण्यासाठी आणले होते. या परिसराकडे जाणारे सर्वच रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुल्ल झाले होते.एकाच ठिकाणी होणार अनेक दिग्गजांच्या सभास्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर सोमवारी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. शुक्रवारी पुन्हा याच मैदानावर काँग्रेसचे राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. याशिवाय विविध राजकीय पक्षाकडून आता शहरात जाहीर सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे या मैदानावरील व्यवस्था तशीच कायम ठेवण्यात आली. राजकीय पक्षाचे बॅनर, पोस्टर तेवढे बदलतील.
सभास्थळावर तरुणांचा ढोल-ताशांसह जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 11:15 PM
चार वर्ष दहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात आले होते. त्यानंतर सोमवार १ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्याच्या भूमिवर पाय ठेवला. मोदींची सोमवारची सभा ऐकण्यासाठी लोकसभा मतदार संघातून ढोल-ताशासह तरूण पोहचले होते. प्रत्येकाच्या जवळ भाजप, शिवसेना, रिपाईचा झेंडा व मोदींचे मुखवटे होते. तर काहींनी तर ‘मै भी चौकीदार हुं’ असा मजकूर लिहून असलेले टी-शर्ट परिधान केले होते.
ठळक मुद्देमोदींना प्रतिसाद देणारे मतदार : पाच वर्षांनंतर पुन्हा ऐकले मोदींना