शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

दोन कोटींच्या निधीतून घोराडचा चेहरा बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:02 AM

घोराड येथील बोरनदी परिसरात घाट बांधकाम व अन्य कामाकरिता २ कोटी ६६ लाख रूपयांचा निधी पर्यटन विकास मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला.

ठळक मुद्देघाट बांधकामाचा शुभारंभ : खासदार व दोन आमदार उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : घोराड येथील बोरनदी परिसरात घाट बांधकाम व अन्य कामाकरिता २ कोटी ६६ लाख रूपयांचा निधी पर्यटन विकास मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला. या कार्यक्रमाला घोराडच्या सरपंच ज्योती घंगारे, जि.प. च्या महिला बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, भाजपा तालुकाध्यक्षा अशोक कलोडे आदी उपस्थित होते.याप्रसंगी खा. रामदास तडस म्हणाले की, वर्धा विधानसभा मतदार संघात रस्ते, प्रवासी निवारा, पांधण रस्ते, स्मशानभूमी, ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विकास कामे, पाणी पुरवठा योजना यासाठी आ. पंकज भोयर यांनी आणलेला निधी यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी आणलेल्या निधीपेक्षा खूप मोठा आहे म्हणून ते खरे कार्यसम्राट आहे.यावेळी आ. समीर कुणावार म्हणाले आ. पंकज भोयर हे विकासकामांच्या निधीसाठी नुसताच पाठपुरावा करीत नाही तर प्रसंगी तो निधी भांडून सुध्दा आणतात. त्यामुळे त्यांच्यात व माझ्यात निधीसाठी नेहमीच चुरस असते. पण एकाच घाटाच्या बांधकामासाठी २ कोटी ६६ लाख रूपयांचा निधी आणून माझ्यापेक्षा आ. भोयर हे सरस ठरले यात शंका नाही.यावेळी आ. पंकज भोयर म्हणाले, काही विरोधक मित्र मला कुदळ मारणारा आमदार म्हणून हिणवतात, पण मी पैसा आणल्याशिवाय कुदळ मारत नाही, असे ठणकावून सांगत सेलू तालुक्यातील जनतेच्या विकासकामांसाठी सदैव प्रयत्नशील राहिल, अशी ग्वाही दिली.यावेळी बबनराव माहुरे गुरूजी, डॉ. सुरेंद्र भुते, सुधाकर खराबे, दीपक झोरे, जितेंद्र पवार, विकास मोटमवार, अरूण तडस, प्रदीप तेलरांधे, धनराज वांढरे, चैतकरण गांजरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. संचालन प्रा. विनोद धानकुटे तर आभार आशीष डोळसकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी संजय तडस, विलास वरटकर, पवार, जाधव आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसtourismपर्यटन