लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.१९) मतदान पार पडले. बुधवारी सकाळी १० वाजता विकास भवनात मतमोजणी करण्यात आली. यात भाजपाचे पाच तर राकाँ, काँगे्रसचे चार उमेदवार विजयी झाले. तत्पूर्वी, १५ सदस्यांची अविरोध निवड झाली होती. यामुळे जिल्हा नियोजन समितीवर २४ पैकी १९ सदस्य भाजपाचेच निवडून गेले आहेत.मंगळवारी जि.प. सभागृहात ग्रामीण निर्वाचन क्षेत्रासाठी, सामाजिक न्याय भवनात लहान नागरी तर पं.स. सभागृहात संक्रमणकालीन मतदार संघासाठी मतदान घेण्यात आले. नऊ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात होते. यासाठी एकूण २७७ पैकी २७२ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ९८ आहे. ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातील चार जागांकरिता ५२ पैकी ५१ सदस्यांनी मतदान केले. यात भाजपच्या रोशन चौखे १०, माधव चंदनखेडे १० आणि रवींद्र उर्फ राणा रणनवरे यांना १२ मते पडली तर काँगे्रसचे चंद्रकांत ठक्कर यांनाही १२ मते पडली. या सर्वसाधारण गटात चार जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात होते. यातील बसपाच्या उमेश जिंदे यांना केवळ ७ मते पडल्याने ते पराभूत झाले.लहान नागरी मतदार संघाच्या चार जागांकरिता आठ उमेदवार रिंगणात होते. यातील १५७ पैकी १५३ मतदारांनी मतदान केले. अनु. जाती गटातील भाजपाचे कैलास राखडे यांनी ८७ मते प्राप्त करीत विजय मिळविला. त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँगे्रसच्या त्रिवेणी कुत्तरमारे यांना ६० मते मिळाली तर ६ मते अवैध ठरलीत. नामाप्र महिला गटातून भाजपच्या प्रतिभा बुरले या ८७ मते घेत विजयी झाल्या तर शिल्पा लाटकर यांना केवळ ६१ मते मिळविता आली. या गटातील ५ मते अवैध ठरली. नामाप्र गटातून राष्ट्रवादी काँगे्रसचे सौरभ तिमांडे यांनी ८९ मते प्राप्त करीत विजय मिळविला. दावेदार मानले जाणारे भाजपचे नरेंद्र मदनकर यांना केवळ ५८ मते मिळविता आली तर ६ मते अवैध ठरविण्यात आली. सर्वसाधारण गटातून भाजपचे अब्दुल कय्युम अब्दुल कादर हे ७८ मते घेत विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी काँगे्रसचे निलेश खोंड यांना ६९ मते मिळाली तर ६ मते अवैध ठरविण्यात आलीत.संक्रमणकालीन मतदार संघातील एका जागेसाठी ६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात सर्वसाधारण गटातून काँगे्रसच्या नितीन दर्यापूरकर यांनी ३८ मते मिळवून विजय प्राप्त केला तर भाजपच्या अनिल देवतारे यांना २८ मते मिळविता आली. या गटात २ मते अवैध ठरली.जि.प. सभागृहात ग्रामीण मतदार संघाची मतदान प्रक्रिया आष्टीच्या तहसीलदार सीमा गजभिये व त्यांच्या कर्मचाºयांनी पार पाडली. लहान नागरी मतदार संघातील मतदान प्रक्रिया सामाजिक न्याय भवन येथे पार पडली. प्रेसायडींग अधिकारी म्हणून हिंगणघाट तहसीलदार सचिन यादव व त्यांच्या कर्मचाºयांनी कामकाज सांभाळले. संक्रमणकालीन मतदार संघासाठी पं.स. सभागृहात मतदान पार पडले. यात आर्वीचे तहसीलदार विजय पवार व कर्मचाºयांनी कामकाज पाहिले.बुधवारी सकाळी १० वाजतापासून विकास भवनात मतमोजणी करण्यात आली. ही प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, आर्वीचे उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, उपजिल्हाधिकारी लोनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, नायब तहसीलदार मिलिंद जोशी, राम कांबळे व कर्मचाºयांनी पार पाडली.भाजपचे १२ तर काँगे्रसचे २ अविरोधग्रामीण निर्वाचन क्षेत्रातील १८ पैकी १४ सदस्यांची अविरोध निवड झाली होती. यामुळे चार जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. अविरोध सदस्यांमध्ये भाजपचे १२ तर काँगे्रसचे २ सदस्य आहे. भाजपचे अनु. जाती गटात ज्योत्सना सरोदे हिंगणघाट, अनु. जाती महिला गटात छाया घोडीले आर्वी, नुतन राऊत वर्धा, अनु. जमाती गटात मयूरी मसराम देवळी, अनु. जमाती महिला गटात चंद्रकला धुर्वे हिंगणघाट, नामाप्र गटात सुनील शेंडे हिंगणघाट, प्रवीण सावरकर देवळी, नामाप्र महिला गटात सुनीता राऊत देवळी, अंकिता होले आर्वी तर सर्वसाधारण महिला गटात राजश्री राठी आर्वी, सरिता गाखरे आर्वी, वैशाली येरावार देवळी तर काँगे्रसच्या सुनीता चांदुकर व वैजयंती वाघ यांचा समावेश आहे. लहान नागरी मतदार संघातील अनु. जाती महिला गटाच्या निता धोबे हिंगणघाट यांची अविरोध निवड झाली.तिमांडेंना सर्वाधिक मतेजिल्हा नियोजन समितीच्या लहान नागरी मतदार संघाच्या चार जागांसाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या मतदानात सर्वाधिक मते हिंगणघाट येथील सौरभ राजू तिमांडे यांनी घेतली आहेत. त्यांना ८९ मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपचे नरेंद्र मदनकर यांना केवळ ५८ मतेच मिळविता आली आहे.पाच सदस्यपद इतरांकडेडीपीडीसीची निवडणूक अविरोध करण्यासाठी जि.प. अध्यक्षासह आमदारांनी प्रयत्न केले; पण काही सदस्यांच्या हट्टामुळे मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत एकूण पाच जागा काँंग्रेस व राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. दोन सदस्यांची अविरोधच निवड झाली होती तर काँगे्रसचे चंद्रकांत ठक्कर व नितीन दर्यापूरकर तथा राष्ट्रवादीचे तिमांडे हे निवडणुकीत विजयी झाले.२५ मते अवैधडीपीडीसीच्या निवडणुकीत पसंती क्रमाने मतदान करावे लागते. एकाच उमेदवाराला पहिली पसंती देता येत नाही. या घोळात लहान नागरी मतदार संघातील २३ तर संक्रमणकालीन मतदार संघातील दोन मते अवैध पडलीत. यामुळे उमेदवारांच्या मतांवर प्रभाव झाल्याचे दिसून आले.
डीपीडीसी: २४ पैकी १९ सदस्य भाजपाचेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:22 AM
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.१९) मतदान पार पडले. बुधवारी सकाळी १० वाजता विकास भवनात मतमोजणी करण्यात आली. यात भाजपाचे पाच तर राकाँ, काँगे्रसचे चार उमेदवार विजयी झाले. तत्पूर्वी, १५ सदस्यांची अविरोध निवड झाली होती. यामुळे जिल्हा नियोजन समितीवर २४ पैकी १९ सदस्य भाजपाचेच निवडून गेले ...
ठळक मुद्देलहान नागरी मतदार संघात धक्का : १५ सदस्यांची अविरोध निवड तर ९ जागांसाठी झाले मतदान