शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे

By admin | Published: April 05, 2017 12:42 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीपूर्वी जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन देण्यात मिळावे

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मार्च महिन्याच्या वेतनाची प्रतीक्षा वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीपूर्वी जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन देण्यात मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्यावतीने निवेदनातून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य सरचिटणीस गजानन थुल, जिल्हाध्यक्ष संजय तायडे यांच्या नेतृत्त्वात देण्यात आलेले निवेदन अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी स्वीकारले. दरवर्षी मार्च महिन्याचे वेतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी करण्याचे प्रावधान आहे. त्यानुसार मार्च २०१७ चे वेतन सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी देण्याची व्यवस्था करावी. शासन परिपत्रकात १ तारखेला वेतन अदा करावे अशी तरतुद आहे. परंतु आजवर १ तारखेला वेतन झालेले नाही. मार्च महिन्याचे वेतन दरवर्षीच रखडते. कर्मचाऱ्यांना होणारी गैरसोय टाळण्यात यावी. तसेच वेतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी करण्याचे प्रयन करावे, अशी मागणी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळणे गरजेचे ठरते. महसुल विभाग, जिल्हा परिषद विभाग, पाटबंधारे विभाग व जिल्ह्यातील विविध विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा आहे. कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेता प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करुन वेतन त्वरीत देण्याची मागणी निवेदनातून केली. शिष्टमंडळात महसूल विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष सत्यजीत भोतमांगे, महेंद्र फुलझेले, मीरा मेश्रामकर, अनिल वाळके, जिल्हा कार्याध्यक्ष शशीकांत अडसड, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, राहुल वाकडे, अशोक म्हैसकार, धर्मपाल कांबळे, मधुकर ठाकरे, कास्ट्राईब जि.प. विभागाचे अध्यक्ष अशोक वासनिक आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)