शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता मनुष्याला जागविणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 10:12 PM

डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्रीय लेखन हे जागतिक संदर्भ विचारात घेत समकालीन प्रश्न मांडणारे, निष्कर्ष काढणारे, प्रयोजन डोळ्यांसमोर ठेवून मनुष्याला जागविणारे असे संशोधनात्मक पद्धतीचे होते, असे मत ज्येष्ठ संपादक सुनील खोब्रागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता व समकालीन पत्रकारिता या विषयावर बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देसुनील खोब्रागडे : रमाई फाऊंडेशनद्वारे रमाई स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्रीय लेखन हे जागतिक संदर्भ विचारात घेत समकालीन प्रश्न मांडणारे, निष्कर्ष काढणारे, प्रयोजन डोळ्यांसमोर ठेवून मनुष्याला जागविणारे असे संशोधनात्मक पद्धतीचे होते, असे मत ज्येष्ठ संपादक सुनील खोब्रागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता व समकालीन पत्रकारिता या विषयावर बोलताना व्यक्त केले. रमाई फाऊंडेशनद्वारा आयोजित रमाई स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. लता प्रतिभा मधुकर, माजी प्राचार्य गोरख भगत प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी प्रा. डॉ. मधुकर या फुले-आंबेडकरी विचारधारा ; स्त्री मुक्तीचा जाहीरनामा या विषयावर बोलताना म्हणाल्या, दोन हजार वर्षांपूर्वी भारतात थेरीगाथा रचणाऱ्या ७५ हजार स्त्रिया लिहित व वाचत असत. हे अद्भूतच होते. ते आपलं जगणं लिहित होत्या. पण, अशा नायिका आपल्याला कधीही न शिकविल्यामुळे हरवल्या आहेत. त्यांना शोधून पुढे आणण्याचे काम फुले-आंबेडकरी समाजाला करावे लागेल, अशा शब्दात आदरांजली अर्पण केली. यावेळी फिजिओथेरेपीस्ट डॉ. सुमित मेश्राम, गायक व संगीतकार अजय हेडाऊ व बाल कलाकार प्रणेती डंभारे यांचा रमाई स्मृती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गायक अजय हेडाऊ यांनी सुमधूर गीते गाऊन डॉ. आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली. तसेच आंबेडकरी समाजातील आजचे वास्तव हे प्रणेती राजेश डंभारे या बालिकेने एकपात्री नाट्यप्रयोगातून सादर केले. प्रास्ताविक सरिता पखाले तर संचालन प्रा. ज्ञानेंद्र मुनेश्वर यांनी केले. आयोजनाकरिता प्रा. महेंद्र पखाले, दिनेश भगत, रविकांत पाटील, नयन सोनवणे, अ‍ॅड. वनिल दखणे, राजा ढाले, संदीप भगत, अशोक कांबळे, मिलिंद साखरकर, डॉ. अमोल लोहकरे, डॉ. प्रमोद कांबळे, मधु ओरके, अनिल खडतकर, अरविंद झामरे, रवींद्र जिंदे, विक्रांत भगत, मंगेश नगराळे, कुणाल भगत, आशिष धवने, चंदन पाटील, हिमांशू जोगळेकर, मिलिंद गायकवाड, शशिकांत खोब्रागडे, मकरंद जोगळेकर, विलास कांबळे, राहुल हलुले, दिनकर वासेकर, सुनील जवादे, छत्रपाल धाबर्डे, सुनील ढाले, मुकुंद नाखले, बाळू कांबळे, विकास डंभारे, भार्गवी भगत, निर्मिती पखाले, ईशा ढाले, शुभांगी भगत, माधुरी साखरकर, माया कांबळे, कल्पना ताकसांडे, अंजली कांबळे, माया राऊत, डॉ. वृंदा साखरकर व छाया खोब्रागडे यांनी सहकार्य केले.प्रणेती डंभारेला रमाई स्मृती पुरस्कारवर्धा- आपल्या सशक्त अभिनय आणि संवाद कौशल्याच्या माध्यमातून निर्धार हा एकपात्री प्रयोग करून सातत्याने समाजाचे प्रबोधन करणारी प्रणेती डंभारे हिला कार्याची पावती म्हणून रमाई फाऊंडेशनने सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित रमाई स्मृतिदिन २०१९ या कार्यक्रमात आणि संपादक सुनील खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, लेखिका, हैदराबाद प्रा. डॉ. लता प्रतिभा मधुकर आणि माजी प्राचार्य गोरख भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत रमाई स्मृती पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर