लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्त्रीयांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य, न्याय, हक्क, सन्मान नाकारणाऱ्या ‘मनुस्मृतीचे’ महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले. स्त्री ही भोगवस्तू नसून ती मानव आहे. तिला मन, भावना, विचार आहेत. हे लक्षात घेवून संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या न्यायहक्क, सन्मानासाठी डॉ. आंबेडकरांचे कार्य अतुलनीय ठरते, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे विधी सल्लागार अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे यांनी केले.महाराष्ट्र अंनिस, राष्ट्रसेवा दल व अनेकांत स्वाध्याय मंदिर यांच्यावतीने आयोजित ४० व्या अभ्यासवर्गात ‘भारतीय स्त्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर झालेल्या व्याख्यानात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले की, बुरसटलेल्या समाजव्यवस्थे विरूद्ध लढा देत महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. त्यांनी स्त्रीयांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. मानवतेचा तोच धागा पकडून डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांकरिता कार्य केले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांच्या उन्नतीसाठी आग्रही असणारे डॉ. आंबेडकर हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा देणारे एकमेव भारतीय होते. परंतु आज मात्र हिंदू स्त्रियांचे विरोधक म्हणून डॉ. आंबेडकर यांचा अपप्रचार केल्या जातो. यासाठी भारतातील प्रत्येक स्त्रीने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. आंबेडकरांचे विचार समजून घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.मंचावर संस्थापक जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले, तालुकाध्यक्ष अरूण चवडे, राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, रजनी सुरकार, सुधीर गवळी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र कांबळे यांनी केले. प्रास्ताविक व अतिथी परिचय सुनील ढाल यांनी दिला. आभार प्रदर्शन संजय भगत यांनी केले.कार्यक्रमाला प्रकाश कांबळे, भीमसेन गोटे, अभिनय हिवंज, किशोर ढाले, अॅड. भास्कर नेवारे, नितीन झाडे, किशोर जगताप, मुकूंद नाखले आदींनी सहकार्य केले. व्याख्यानाकरिता अंनिस पदाधिकारी व गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती.
स्त्रियांच्या न्याय हक्कांसाठी डॉ. आंबेडकरांचे कार्य अतुलनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:42 AM
स्त्रीयांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य, न्याय, हक्क, सन्मान नाकारणाऱ्या ‘मनुस्मृतीचे’ महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले. स्त्री ही भोगवस्तू नसून ती मानव आहे. तिला मन, भावना, विचार आहेत. हे लक्षात घेवून संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या न्यायहक्क, सन्मानासाठी डॉ. आंबेडकरांचे कार्य अतुलनीय ठरते,
ठळक मुद्देकपिलवृक्ष गोडघाटे यांचे प्रतिपादन : स्त्री मुक्तीवर व्याख्यान