- अभिनय खोपडेवर्धा : सबंध राज्याला हादरा देणाऱ्या आर्वी येथील गर्भपात प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. कदम रुग्णालयात गर्भपात मोठ्या प्रमाणावर केले जात होते. याचा मुख्य सूत्रधार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीरज कुमारसिंग कदम हाच आहे, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.आर्वीच्या ज्या उपजिल्हा रुग्णालयात तो कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता, तेथे मोठ्या प्रमाणावर बाळंतपण शस्त्रक्रियेसाठी शहर व ग्रामीण भागातून महिला येत. यातील अनेकांचे सिझर डॉ. नीरज हा आपल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेऊन करीत होता, अशी माहिती वैद्यकीय वर्तुळातून पुढे आली आहे. माजी खासदार, माजी आमदार नानाजी ऊर्फ जगजीवनराव कदम यांच्या कुटुंबातील सदस्य असलेले कुमारसिंग कदम व शैलजा कदम यांचे ४० वर्षांपूर्वी देऊरवाडा मार्गावर लहानसे क्लिनिक होते. त्यानंतर त्यांनी २० वर्षांपूर्वी पुलगाव- तळेगाव श्या. पंत मार्गावर आर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात दीड एकराच्या जागेत भव्य हॉस्पिटल उभे केले. अवैध गर्भपात प्रकाराला चालना देण्याचे काम सुरू झाले. अनेकदा डॉ. रेखा कदम यांचा या प्रकाराला विरोध असला तरी पती व कदम कुटुंबीयांच्या दबावातून त्यांनाही या प्रकरणात सहभागी होणे भाग पडायचे, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.उपजिल्हा रुग्णालयावरही कदमचेच होते वर्चस्व उपजिल्हा रुग्णालय हे वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयानंतरचे सर्वांत मोठे रुग्णालय आहे. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर डॉ. नीरज याचा दबाव राहायचा. तो सांगेल ती पूर्व दिशा, अशी परिस्थिती होती. त्यामुळेच उपजिल्हा रुग्णालयातील औषध आदी बाबी सर्रास तो आपल्या खासगी हॉस्पिटलमध्ये वापरत होता. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनाही याची माहिती होती; परंतु कदम याच्या दहशतीपुढे साऱ्यांनी हात टेकले होते. आरोग्य विभागाला आढळल्या ‘या’ त्रुटी...बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट, एमटीपी ॲक्टनुसार अनियमितता.रुग्णालयात ५ बेडचा प्रस्ताव असताना प्रत्यक्षात ७ बेड.डॉ. रेखा कदम यांचे एमएमसी रजिस्ट्रेशन नाही.पीसीपीएनडीटी ॲक्टनुसार अनियमितता.फॉर्म एफमध्ये सोनोग्राफीची कारणे नमूद केली नव्हती.मुलीच्या बाबतीत एमटीपी केल्याचा, तसेच सोनोग्राफी केल्याचा अहवाल नव्हता.बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये अनियमितता.पीडितेच्या गर्भपाताची विल्हेवाट कशी लावली, याबाबत दस्तावेज आढळून आले नाहीत.
गर्भपात केंद्राचा खरा सूत्रधार डॉ. नीरज कदमच; पोलीस तपासातून उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 6:00 AM