भीम टायगर सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वर्धा : मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व येथील समृद्ध प्रिटींग प्रेस पाडणाऱ्यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी भीम टायगर सेनेद्वारे निवेदनातून जिल्हाधिकारी यांना करण्यात आली. यात दोषी असलेला रत्नाकर गायकवाड व त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर शासन करावे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कठोर शासन न झाल्यास भीम टायगर सेनेद्वारे कठोर आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिष्टमंडळात भीम टायगर सेनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल दिवे, ललित धनवीज, प्रवीण बन्सोड, प्रशिल भगत, आशिष सोनटक्के, पंकज लभाने, अमरदीप कांबळे, पंकज सातपुडके यांचा सहभाग होता.(शहर प्रतिनिधी) गुजरातच्या दलितांवरील अत्याचाऱ्यांवर कारवाई करा गुजरात येथील ऊणा या गावात व इतर अनेक ठिकाणी दलितांवर अमानवीय अत्याचार झालेत. त्यामुळे अनेकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. केंद्रात आणि गुजरात मध्ये भारतीय जनता पक्षाचेच सरकार आहे. गुजरात येथील दलितांना सुरक्षा द्यावी. अत्याचार करणाऱ्या जातीय वाद्यांवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी भीम टायगर सेनेद्वारे करण्यात आली.
डॉ. आंबेडकर भवन व प्रिंटींग पे्रस पाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
By admin | Published: July 23, 2016 2:40 AM