शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

मद्यप्राशन करून वाहन चालविताय? सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:29 AM

वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे मागील काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले असून चिंतनाचा विषय ठरला आहे. याकरिता पोलिस विभागाकडून न्यायालयाच्या निर्णयानुसार कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यापुढे मद्य, शिवाय अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविताना आढळल्यास तीन महिन्यांकरिता परवाना निलंबनासोबतच पोलीस कारवाईअंती थेट तुरुंगात जावे लागणार आहे.

ठळक मुद्देपरवाना निलंबनासह खावी लागेल तुरुंगाची हवा

सुहास घनोकार ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे मागील काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले असून चिंतनाचा विषय ठरला आहे. याकरिता पोलिस विभागाकडून न्यायालयाच्या निर्णयानुसार कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यापुढे मद्य, शिवाय अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविताना आढळल्यास तीन महिन्यांकरिता परवाना निलंबनासोबतच पोलीस कारवाईअंती थेट तुरुंगात जावे लागणार आहे. या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सध्या वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून केली जात आहे.शहरात मागील काही वर्षांपासून नवशिक्या वाहनचालकांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे. वेगाने वाहन पिटाळणे, रस्त्यावर स्टंटबाजी करणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, विना परवाना, विना हेल्मेट वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे चालकांच्या आदी बेशिस्त कृतींमुळे वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते. यामुळे दररोज अपघाताच्या घटना घडत असून यात निष्पापांना जीव गमवावा लागत आहे. वाहतूक पोलिसांनी अनेकवार कारवाईचा बडगा उगारून देखील या प्रकारांना आळा बसलेला नाही. शहरातील बॅचलर रोड, प्रमुख मार्ग, नागपूर मार्ग व अन्य वर्दळीच्या मार्गांवर नवशिके आणि तरुणाई वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसते. ठोस कारवाई होत नसल्याने हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेने आता कंबर कसली आहे.आता विहित मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, सिग्नल तोडून जाणे, मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, मद्य, शिवाय अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे या बेशिस्त कृती वाहनचालकांना भोवणार आहेत. असे आढळून आल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम २१ नुसार वाहनचालकांचा परवाना किमान तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या कारवाईला प्रारंभ झालेला आहे.मद्य प्राशन करून, अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविताना आढळल्यास परवाना निलंबनाच्या कारवाईव्यतिरिक्त खटला दाखल करण्यात येणार असून मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम १८५ नुसार पोलिसांनी न्यायालयाकडे मागणी केल्यास वाहनधारकाला तुरूंगातही जावे लागणार आहे.परवाने निलंबनाकरिता २५० प्रस्तावअतिवेगाने, शिवाय वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे व अन्य प्रकारे कारवाईच्या अनुषंगाने परवाने निलंबनाचे २५० प्रस्ताव पोलिस विभागाकडे आले असून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने लवकरच निलंबित करण्यात येणार आहेत.आता महामार्गांवर हेल्मेटसक्तीअपघातांचे प्रमाण टाळण्याकरिता गतवर्षी शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. याला विविध स्तरातून विरोध झाला, तरीदेखील कारवाई सुरूच होती. यामुळे अपघातांचे प्रमाण काही अंशी कमी झाले होते. मध्यंतरीच्या काळात वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षकांचे सावंगी ठाण्यात स्थानांतरण झाल्यानंतर ही कारवाई गुंडाळली गेल्याने हेल्मेटचा विषय मागे पडता होता. हेल्मेटसक्तीत आता वाहतूक पोलिसांनी शिथिलता आणली असून आता लवकरच महामार्गांवर हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे.रस्ते अपघातात पाच वर्षांत ९८८ जणांचा मृत्यू२०१३ मध्ये अपघाताच्या ६८८ घटना घडल्यात. यात १५८ जणांचा मृत्यू झाला. १६२ जणांना गंभीर, तर तर ३१८ जणांना किरकोळ दुखापत झाली. २०१४ मध्ये ५६३ अपघात झालेत. यात १६६ जणांना जीव गमवावा लागला. ११३ जणांना गंभीर तर २३२ जणांना किरकोळ इजा झाली. २०१५ मध्ये ५४५ अपघात १७२ जणांचा मृत्यू, १०२ जणांना गंभीर तर २२५ जणांना किरकोळ इजा झाली. २०१६, १७९ जणांचा मृत्यू, १२० जणांना गंभीर तर २४६ जणांना किरकोळ दुखापत, २०१७ मध्ये १६७ जणांचा मृत्यू, १०४ जणांना गंभीर तर १९६ जणांना किरकोळ, २०१८ या वर्षात १४६ जणांना जीव गमवावा लागला. ८९ जणांना गंभीर तर १३० जणांना किरकोळ दुखापत झाली.

टॅग्स :liquor banदारूबंदीAccidentअपघात