शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

मद्य प्राशन करून, बेफामपणे वाहन चालविणे पडेल महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 5:00 AM

चैतन्य जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वेगाने अन् मद्य प्राशन करून वाहन चालवित असाल तर सावधान! शहर ...

ठळक मुद्देदोन अत्याधुनिक वाहने दाखल : वाहतूक पोलीस विभाग झाला ‘हायटेक’

चैतन्य जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वेगाने अन् मद्य प्राशन करून वाहन चालवित असाल तर सावधान!शहर वाहतूक विभागात या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. इर्टिगा कंपनीच्या या दोन वाहनांमध्ये फिक्स टेबल अटॅच वुईथ स्पीडगन मशीन, डी. डी. मशीन आणि जीपीआरएस कनेक्टिव्हिटीची व्यवस्था आहे. यामुळे बेफामपणे शिवाय मद्य प्राशन करून वाहन चालविणे चांगलेच महागात पडणार आहे.शहरात अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करीत असले तरी मोजक्या चालकांच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. यावर प्रतिबंध म्हणून आणि दोषी वाहनचालकांवर कारवाई व्हावी, म्हणून ही दोन वाहने महत्त्वाची भूमिका बजावरणार आहेत.या दोन वाहनांमध्ये असलेली फिक्स टेबल अटॅच वुईथ स्पीडगन मशीन ही वेगाशी स्पर्धा करणाऱ्या वाहनचालकांना अचूक वेधून कारवाई करू शकतील. उल्लेखनीय म्हणजे, ५०० मीटरपर्यंतच्या वाहनचालकावर कारवाई करणे शक्य होणार आहे. तसेच या वाहनातील डी.डी. मशीन म्हणजे 'ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह' दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी या मशीनचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर जीपीआरएस कनेक्टिव्हिटी असलेले संयंत्रही वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवणार आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे तसेच शहर वाहतूक ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांच्या प्रयत्नाने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्यात मोलाची मदत होणार आहे. संपूर्ण शहरात ही दोन्ही वाहने पेट्रोलिंग करणार असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे.वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही असेल ‘वॉच’या वाहनात जीपीआरएस कनेक्टिव्हिटीची व्यवस्था एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. वाहतूक पोलिस हे वाहन घेऊन गस्तीवर जातील तेव्हा ते कुठे आहेत आणि काय करीत आहेत ? याची माहितीदेखील वाहतूक शाखेच्या कार्यालयाकडे असणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे वाहन अडगळीत उभे करून आराम करण्याचे दिवस आता संपले आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांनाही सतर्क असावे लागणार आहे. याशिवाय कुठेही वाहतूक कारवाई करावयाची असल्यास या वाहनातील पोलिसांशी संपर्क करून त्यांना तत्काळ घटनास्थळी पाठविण्याची व्यवस्था या सिस्टीममध्ये आहे.'स्पीड गन कार'ची वैशिष्ट्येस्पीड गन कारमध्ये लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन, ई-चलन, ब्रिथ अ‍ॅनालायझर समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करणे वाहतूक शाखेला सोपे होणार आहे. या वाहनात रस्त्यावर भरधाव वेगाने येणारी वाहने, चारचाकी वाहनात काळी फिल्म लावणाºयांवर स्पीडगन यंत्राच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे. एखादे वाहन वेगमर्यादेचे उल्लंघन करून पळाल्यास ३०० मीटरपर्यंत लांब असलेल्या वाहनाचा क्रमांकसुद्धा टिपता येणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्याविरुद्ध कारवाईसाठी एक ब्रिथ अ‍ॅनालायझरही या कारमध्ये आहे. ही कार स्वयंचलित असून, नियमाचे उल्लंघन करणारयांना थेट मोबाइलवर नोटीस पाठविली जाणार आहे. जिल्ह्यात दाखल झालल्या दोन स्पीड गन वाहनांपैकी एक जिल्हा वाहतूक शाखा आणि दुसरे जाम रोड महामार्ग चौकीला देण्यात आले आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस