शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
3
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
4
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
5
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
6
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
7
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
8
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
9
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
10
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
11
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
12
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
13
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
14
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
15
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
16
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
17
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
18
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
19
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
20
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली

मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात दारूचा पूर

By admin | Published: June 10, 2017 1:27 AM

गाव मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले आहे. परंतु, ग्रामस्थांना मुलभूत सोईसुविधांसाठी ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क केळझर : गाव मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले आहे. परंतु, ग्रामस्थांना मुलभूत सोईसुविधांसाठी ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. ग्रा.पं.च्या बेताल कारभारामुळे गाव समस्यांचे गोदाम बनले आहे. या गावात पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहे. गावात पाण्याकरिता भटकंती होत असून दारू मात्र मुबलक प्रमाणात मिळत आहे. येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये पाण्याची समस्या बिकट निर्माण झाली आहे. घरगुती नळाला पाणीच येत नसल्याने ग्रामस्थांना शेतातून बैलबंडी व ट्रॅक्टरने पाणी आणावे लागत आहे. तर ज्यांच्याकडे या सुविधा नाहीत अशांना रात्रीचा दिवस करून कुपनलिकेवरून पाणी भरावे लागते. सद्या जमिनीतील पाणीपातळी खोल गेली असल्याने रात्र जागुन ग्रामस्थांना पाण्याची तजविज करावी लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रा.पं.ला व सरपंचाकडे अनेकदा पाणी टंचाईची समस्या सोडविण्याची विनंती केली; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीकडून कागदोपत्री सगळे ‘आल इज बेल’ असल्याचे सांगितल्या जाते; पण, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर गावाचे वास्तव त्यांना कळू शकेल. आतापर्यंत तीन ग्रामविकास अधिकारी बदलले. मात्र, कायमस्वरूपी अधिकारी देण्यात आला नाही. पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आहे.