लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करणारे नगदी उत्पादन म्हणून विदर्भात सोयाबीन पिकाची ओळख आहे. परंतु या नगदी पिकाला अस्मानी तथा सुलतानी संकटाने वेठीस धरल्याचे पढेगावसह जिल्ह्यात दिसून येते.पढेगाव येथील शेतकरी जगदीश आंबटकर यांच्या शेतातून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. परंतु अभियंत्याचे अज्ञान व कामचलावू धोरण आणि नियोजनशून्यतेमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.कालव्याचे खोदकाम करून आंबटकर यांच्या शेतात मुरूम टाकण्यात आला. येथे सिमेंट पाईप टाकणे गरजेचे होते. परंतु, अभियंत्याने मनमर्जी चालवत केवळ मुरूमच टाकला. यामुळे पावसाळ्यातील पाणी पूर्णत: सदर शेतकºयाच्या शेतात साचले व दोन एकर शेतातील सोयाबीन पीक पूर्णत: पाण्यात बुडाले. साचलेल्या पाण्यामुळे उभे सोयाबीन पीक सडत आहे. सद्यस्थितीत शेतात दोन फुटांवर पाणी साचून आहे. ३५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी आंबटकर यांनी सांगितले. केवळ अधिकाºयांच्या दिरंगाईमुळे शेतकºयाच्या आर्थिक नुकसानात भर पडली आहे. संबंधित विभागाने नुकसानाची पाहणी करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संबंधित शेतकºयाने केली आहे.ज्या वेळेस मुरूम टाकणे सुरू होते, त्याच वेळी सिमेंट पाईप टाकण्याची मागणी केली होती. मात्र, दखल घेण्यात आली नाही. यामुळे आज शेतातील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला व पिकांचे नुकसान झाले आहे.- जगदीश आंबटकर, शेतकरी, पढेगाव.
कालव्याच्या खोदकामामुळे बुडाले पीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 9:43 PM
शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करणारे नगदी उत्पादन म्हणून विदर्भात सोयाबीन पिकाची ओळख आहे. परंतु या नगदी पिकाला अस्मानी तथा सुलतानी संकटाने वेठीस धरल्याचे पढेगावसह जिल्ह्यात दिसून येते.
ठळक मुद्देशेताला तलावाचे स्वरूप। ३५ हजारांचे नुकसान, आर्थिक अडचणीत भर