शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दुष्काळसदृश स्थिती; तीन तालुक्यावरून दोनवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:58 PM

पावसाने यंदा हुलकावणी दिल्याने राज्यभरात दुष्काळाचे सावट पसरलेले आहेत. त्यामुळेच शासनाने २३ आॅक्टोंबरच्या आदेशान्वये राज्यातील १८० तालुक्यामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करुन या तालुक्यांना विविध योजना व सवलती लागू करण्याच्या सूचना केल्या.

ठळक मुद्देरॅण्डम पाहणी : जिल्हा प्रशासन म्हणते, समुद्रपूर तालुक्यातील पिकांची स्थिती चांगली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाने यंदा हुलकावणी दिल्याने राज्यभरात दुष्काळाचे सावट पसरलेले आहेत. त्यामुळेच शासनाने २३ आॅक्टोंबरच्या आदेशान्वये राज्यातील १८० तालुक्यामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करुन या तालुक्यांना विविध योजना व सवलती लागू करण्याच्या सूचना केल्या. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील कारंजा, आष्टी व समुद्रपूर तालुक्याचा समावेश होता. परंतू प्रशासनाकडून करण्यात आलेल्या रॅण्डम पीक पाहणीत समुद्रपूर तालुक्यातील परिस्थिती चांगली असल्याचा अंदाज वर्तविल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय उपाययोजना व सवलीतीपासून मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्यातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन शासनाने दुष्काळसदृष्य १८० तालुक्यांची पहिली यादी जाहीर केली. जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती काही ठिकाणी बरी दिसत असली तरी सोयाबीनची उतारी घटली आहे. काही ठिकाणी कापसाची उलंगवाडी सुरु झाल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे.परंतू शासनाच्या निकषानुसार पहिल्या यादीत देवळी, समुद्रपूर, आष्टी व कारंजा या चार तालुक्यांचा प्रशासनाने समावेश केला होता. कालांतराने देवळी तालुक्यातील पिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने देवळी तालुका वगळल्याने आष्टी, कांरजा आणि समुद्रपूर या तीन तालुक्यांचा दुष्काळसदृष्य यादीत समावेश झाला. या तिन्ही तालुक्यांना विविध योजना व सवलती लागू करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्यात.त्यानंतर शासनाच्यावतीने यादीत समावेशित असलेल्या तालुक्यांतील गावांमध्ये रॅण्डम पद्धतीने पीक पाहणी करुन ती माहिती महामदत अ‍ॅपवर भरायची होती. त्यानुसार तहसिलदार व कृषी विभागाने पीक पाहणी केली असता समुद्रपूर तालुक्यात पीक परिस्थिती चांगली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा तालुका दुष्काळसदृष्य तालुक्यांच्या यादीत राहणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून अद्यापही दुष्काळासंदर्भातील माहिती संकलनासह अन्य प्रक्रिया सुरूच असल्याने या दृष्काळसदृष्य परिस्थितीत कोणत्या तालुक्यांचा समावेश होणार किंवा कोणते तालुके यातून वगळणार, हे सध्यातरी सांगणे कठीण आहे.अशी राबविली रॅण्डम पद्धतजिल्ह्यातील तीन तालुक्यांचा दुष्काळसदृश्य परिस्थितीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कारंजा तालुक्यातील १२१ गावे, आष्टी तालुक्यातील १५४ तर समुद्रपूर तालुक्यातील २२२ गावांचा समावेश आहे. या सर्वच गावांना भेटी देऊन पाहणी करणे शक्य नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून रॅण्डम पध्दतीने पीक पाहणी करण्यात आली. यानुसार एकूण गावाच्या संख्येच्या दहा टक्के गावांत पीक पाहणी करण्यात आली. यामध्ये कारंजा तालुक्यातील १२, आष्टी तालुक्यातील १५ तर समुद्रपूर तालुक्यामधील २२ गावांची पाहणी तहसीलदार व कृषी विभागाने केली आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे.दुष्काळाचे आधारदुष्काळ जाहीर करताना शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार न करता आर्द्रता, पर्जन्यमान, वनस्पती स्थिती तसेच भूजलपातळी निर्देशांक या सर्व बांबींचा विचार केल्या जातो. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती बिकट असतानाही या निकषामुळे दुष्काळावर पांघरुन टाकण्याचे काम केले जाते.या सवलती मिळणारदुष्काळसदृष्य गावांना जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पूनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी सवलती दिल्या जाणार आहेत.