किशोर तेलंग।लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (टालाटुले) : यंदाचा खरीप प्रारंभीपासूनच शेतकऱ्यांकरिता नुकसानीचा ठरला आहे. पावसाची प्रतीक्षा, बोगस बियाने यातून बचावलेला कापूस उत्पादक बोंडअळीच्या संकटात अडकला. हे संकट ओलितावर अधिक दिसून आल्याने कोरडवाहू शेतकरी यातून बचावल्याचे दिसत आहे. कपाशीचे जेही उत्पादन झाले ते कोरडवाहू क्षेत्रातीलच असल्याचे दिसते.जिल्ह्यात यंदाच्या हंगामात २ लाख ८० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. बºयाच शेतकऱ्यांनी उत्तम उत्पादनाकरिता ओलीत करण्याचे नियोजन केले. हेच ओलित शेतकऱ्यांकरिता आता नुकसानीचे ठरत असल्याचे दिसून आले आहे. बीटी कपाशीवर कीड येत नसल्याचे अनेक कंपन्यांनी सांगितले. पण त्यांचा हा दावा यंदा फोल ठरला. बिटीच्या बियाण्यांवर बोंड आणि गुलाबी अळीने चांगलाच हल्ला केला. या अळीच्या हल्ल्यामुळे शेतकरी चांगलाच हैराण झाला. अळीचा हल्ला ओलिताच्या क्षेत्रात अधिक असल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांनी ओलित करून कपाशीचे पीक घेतले. या शेतकऱ्यांच्या शेतात या किडीने मोठ्या प्रमाणात हैदोस घातल्याचे दिसून आले आहे. कृषी विभागानेही सुमारे ८० टक्के शेतात बोंडअळीचा प्रकोप झाल्यायचे म्हटले आहे. उर्वरीत वीस टक्के शेतकरी कोरडवाहू कापूस घेणारे आहे. कोरडवाहू पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा उत्तम उत्पादन झाल्याचे बोलले जात आहे. कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात आतापर्यत कापसाची दोन वेळा वेचणी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रारंभी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तिसऱ्या वेच्याची शक्यता नसल्याचेच चित्र आहे.दरवर्षी या भागात तिजेपर्यंत कापूस चालतो. पण यावर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीवर कीड आल्याने जानेवारी महिन्यातच उलंगवाडी होण्याचे चित्र आहे. कोरडवाहू शेतातील कापूस निघून डिसेंबर महिन्यातच उलंगवाडी झाली आहे. यामुळे कपाशीचे यंदा अपेक्षेपेक्षा उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत. असे असले तरी बाजारात झालेली आवक गत वर्षीच्या तुलनेत विशेष कमी नसल्याचे दिसून आले आहे. बाजारात कपाशीची झालेली आवक ही पहिल्या वेच्यातलच असावी असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. येत्या दिवसात यात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे.ओलितापेक्षा कोरडवाहूची उतारी अधिकसाधारणत: ओलिताची सोय असलेला शेतकरी अधिक उत्पन्न घेत असल्याचे आतापर्यंत दिसून आले. यंदा मात्र हा नियम बदलल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या खरीपात कोरडवाहू शेतकऱ्याला एकरी आठ क्विंटल तर ओलित असलेल्या शेतकऱ्याला पाच क्विंटलचीच उतारी आली आहे.शेतकरी उधारी फेडण्याच्या विवंचनेतदरवर्षी शेतकरी सावकाराकडून, कृषी केंद्रातून उधारीवर बियाणे, खत, औषध घेवून शेती चालवितो. अशातच या वर्षी मजुराचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने काही शेतकऱ्यांनी शहरातून मजूर आणून कापूस वेचला. २० किलो कापूस वेचण्यासाठी २०० रुपये मोजावे लागले. त्यातही प्रारंभी ४,१०० ते ४,५०० रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कापूस विकावा लागला. यावर्षी बोंडअळीने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले. त्यामुळे सावकाराकडून घेतलेले कर्ज, कृषी केंद्र चालकाची उधारी कशी द्यावी या विवंचनेत शेतकरी आहे. यामुळे शासनाने योग्य सर्व्हे करून या भागातील बोंडअळीची मदत सरसकट द्यावी अशी मागणी होत आहे.
यंदाच्या खरिपात ओलितापेक्षा कोरडवाहू शेती ठरली फायद्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 9:56 PM
यंदाचा खरीप प्रारंभीपासूनच शेतकऱ्यांकरिता नुकसानीचा ठरला आहे. पावसाची प्रतीक्षा, बोगस बियाने यातून बचावलेला कापूस उत्पादक बोंडअळीच्या संकटात अडकला. हे संकट ओलितावर अधिक दिसून आल्याने कोरडवाहू शेतकरी यातून बचावल्याचे दिसत आहे.
ठळक मुद्देकपाशीच्या उत्पादनात तूट : किडीचे प्रमाण ओलितावरच अधिक; सोयाबीनचीही तिच स्थिती; तुरही सुकण्याच्या मार्गावर