शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

येळाकेळीत धामनदीपात्राला कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:02 PM

शहरासह लगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या येळाकेळीतील धाम नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने जलसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देजलसंकट होणार गडद : रखरखत्या उन्हात नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह लगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या येळाकेळीतील धाम नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने जलसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत.अत्यल्प झालेल्या पावसामुळे यावेळी जिल्ह्यातील मध्यम आणि लघु जलाशयांमध्ये अल्पसा जलसाठा शिल्लक आहे. पाणीटंचाईसदृश परिस्थिती असतानाच तापमानही ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचले आहे.सद्यस्थितीत शहरात आठ दिवसांआड तर ग्रामीण भागातही आठ ते दहा दिवसांआड नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. कमी पावसामुळे यावेळी डिसेंबर महिन्यापासूनच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने अनेकांनी बोअरवेल केल्या. अद्यापही शहरासह लगतच्या ग्रामीण दररोज बोअरवेल केल्या जात आहेत. वर्धा शहर आणि ग्रामीण भागाला येळाकेळी येथील नदीवरून पाणीपुरवठा होतो.या पात्रातही सद्यस्थितीत ठणठणाट आहे. आठ-आठ दिवसांआड नळाद्वारे पाणी येत असल्याने नागरिकांची रखरखत्या उन्हात भटकंती होत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे. अनेक ठिकाणी हॅण्डपंप आहेत, मात्र भूजल पातळी खालावल्याने त्यातूनही पाणी येणे बंद झाले आहे. मार्च महिन्यातच ही स्थिती असल्याने एप्रिल, मे महिन्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, हे खरे.नगरपालिका, जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांचा अभावजल है तो कल है, पाण्याची बचत काळाची गरज, पाच्याचा जपून वापरण्याविषयी नगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना उपदेशाचे डोज पाजले जात आहेत. मात्र, जुने जलस्रोत जिवंत करण्याबाबत प्रशासनाकडून कुठलेही नियोजन करण्यात आले नाही, ही वस्तुस्थिती नाकारयता येणार नाही. कडक उन्हाळ्याचे आणखी दोन महिने शिल्लक आहेत. मार्चच्या अखेरीसच ही परिस्थिती असल्याने नागरिकांना यावेळी प्रथमच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

जलाशयांमध्येही अल्प जलसाठायंदा जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाले. यामुळे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम जलाशयांमध्येही अल्प जलसाठा शिल्लक आहे. पवनार येथील धामनदीपात्रातील पाणीपुरवठा योजनेचा फुटव्हॉल्व्ह वर्ध्याच्या इतिहासात प्रथम उघडा पडला आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हासोबतच पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. भूजलपातळी खालावल्याने बोअरवेलदेखील कित्येक फूट खोल केल्यानंतर पाणी लागत आहे. अनेक हातपंप कोरडे झाल्याने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.