शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

वणा नदी पात्राला डबक्यांचे स्वरूप

By admin | Published: April 26, 2017 12:25 AM

उन्हाची तीव्रता वाढली असून जलसाठ्यात घट होत आहे. पाण्याचे भांडार असलेल्या नद्यांचे पात्रही कोरडे पडत आहे.

नदीच्या अस्तित्वाला धोका : सार्वजनिक पुढाकाराची गरज हिंगणघाट : उन्हाची तीव्रता वाढली असून जलसाठ्यात घट होत आहे. पाण्याचे भांडार असलेल्या नद्यांचे पात्रही कोरडे पडत आहे. हिंगणघाट शहराला वरदान ठरलेल्या वणा नदीच्या पात्राचेही डबक्यांत रूपांतर झाले आहे. यामुळे पावसाळ्यापर्यंत नदीला पाणी राहणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही नदी वाचविण्यासाठी संघटनांनी पुढाकार घेतला असला तरी प्रशासन मात्र कारवाई करीत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. परिसरातील शेतीचे नंदनवन फुलविणारी बारमाही वाहणारी नदी सध्या कोरडी पडण्याच्या मार्गावर आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच नदीचे डबक्यांमध्ये रूपांतर झाल्याचे पाहावयास मिळते. पाण्याचा वाहता प्रवाह थांबला आहे. नदीचे पात्र कोरडे पडत असल्याने पाणीटंचाईचे संकट ओढवणार आहे. या समस्येवर प्रशासन उपाययोजना करेल; पण नदीच्या अस्तित्वाचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बारमाही वाहणारी, असा लौकीक असणारी वणा नदी मागील वर्षांपासून डबक्यांमध्ये परिवर्तीत होते. यावर्षी एप्रिल महिन्यातच नदीचा वाहता प्रवाह थांबला आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून गवत आणि झुडपांचा विळखा पडला आहे. अनेक ठिकाणी नदीचे पात्र उथळ झाले असून केवळ झुडपेच दिसून येतात. शहराला वळसा घालून वाहणारी वणा नदी पूढे ग्रामीण भागात पाणी पुरवून शेतीचे नंदनवन फुलविते. शिवाय शहराला पिण्याचे पाणी पुरविते. ही नदी या भागाची जीवनवाहिनी ठरली असली तरी आज तिलाच वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वणा नदीचे अस्तित्व नष्ट होऊ पाहत असल्याने प्रत्येक वर्षी पालिका प्रशासनाला पाणी विकत घ्यावे लागत असल्याची स्थिती आहे. यंदाही ही नामुष्की ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वणा नदीवर असलेल्या रेती घाटांचे दरवर्षी लिलाव केले जातात. या माध्यमातून रेतीची मोठ्या प्रमाणात उचल केली जाते. प्रशासनाकडून ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक रेतीचा उपसा केला जात असल्याने नदीच्या पात्रात खोलवर खड्डे पडले आहेत. याचाच परिणाम म्हणून नदीचे पात्र गतवर्षीपासून डबक्यांमध्ये परिवर्तीत होत असल्याचे दिसते. वणा नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना निवेदने दिलीत; पण अद्याप तरी त्याचा उपयोग झाल्याचे दिसत नाही. शहरासह पूढे ग्रामीण भागात वाहणाऱ्या नदी पात्राचेही असेच हाल झाल्याचे पाहावयास मिळते. कुठे डबके आहे तर कुठे केवळ माती, मुरूम आणि झुडपांचेच साम्राज्य नदीच्या पात्रात पाहावयास मिळते. शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे; पण अद्याप वणा नदीचा या अभियानात समावेश करण्यात आलेला नाही. वणा नदीच्या पात्राचे सध्या खोलीकरण करणे गरजेचे आहे. शिवाय घाटांचे लिलाव काही वर्षे बंद ठेवल्यास रेती तयार होऊन पात्र वाहते राहू शकेल; पण या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत आहे. परिणामी, वणा नदी व शहराचे सौंदर्य लुप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(शहर प्रतिनिधी)